अर्णव गोस्वामींना अंतरिम जामीन नाहीच, मुंबई हायकोर्टाने अर्ज फेटाळला.

अर्णव गोस्वामी यांचा तळोजा तुरुंगातील मुक्काम वाढला.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

मुंबई डेस्क, दि. ०९ नोव्हें : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या अर्णब गोस्वामी यांचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला आहे.

अर्णव गोस्वामी यांच्यावतीने त्यांच्या वकिलाने एफआयआर रद्द करण्यासाठी आणि जामीन मिळण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. तीन दिवस त्यावर दोन्ही बाजूने युक्तिवाद करण्यात आला. परंतु नियमाप्रमाणे जामीनासाठी आधी सत्र न्यायालयात याचिका करावी. हे एक्सट्रा ऑर्डिनरी प्रकरण नाही. त्यामुळे जामिनासाठी ज्या प्रचलित यंत्रणा आणि पद्धती आहे. त्यानुसारच अर्ज करून जामीन घेण्यात यावा, असे निर्देश कोर्टाने दिले. या प्रकरणात जामीन दिल्यास ही प्रथा पडून जाईल आणि कोणीही उठसूठ उच्च न्यायालयात येऊन जामिनासाठी अर्ज करेल, असं मतही कोर्टाने व्यक्त केलं. तसेच जामिनासाठी सत्र न्यायालयात जाण्याचे निर्देशही उच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी कोर्टाकडून यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे अर्णब गोस्वामी यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.

दरम्यान उच्च न्यायालयात सुनावणी होण्याच्या अर्धा ते एक तासापूर्वी अर्णब गोस्वामी यांनी जामीनासाठी अलिबाग सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
तर दुसरीने चार दिवसात निकाल देण्याचे निर्देश हायकोर्टाने सत्र न्यायालयाला दिले आहेत. चार दिवसात सत्र न्यायालयात सुनावणी झाली नाही तर अर्णब गोस्वामी यांची दिवाळी तळोजा कारागृहातच होण्याची शक्यता आहे.

Arnav Goswami