मी राजकारणात आले म्हणून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय –  खा. नवनीत राणा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

अमरावतीच्या खा. नवणीत राणा यांना जात वैधता प्रमानपत्राबाबत नुकताच सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. नवनीत राणा यांनी ज्यावेळी राजकारण करायला सुरुवात केली तेव्हा नवनीत राणा महाराष्ट्रीयन नाहीत असा सुर निघाला. मात्र नवनीत राणा यांनी महाराष्ट्रीयन असल्याचा पुरावा दिला.

२०१९ च्या लोकसभा निवडणूकीमध्ये नवनीत राणा निवडुन आल्यात त्यावेळी त्यांनी शिवसेना माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना पराजित केलं होतं. मात्र अडसूळ याना पराजय पचवता आला नसल्याची टीका खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.

दरम्यान लोकसभामध्ये सर्वसामान्य लोकांसाठी प्रश्नावली केली, महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेवर टीका करीत असल्याने हा प्रकार होतोय. मी राजकारणात असल्याने माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय. मात्र खासदार राणा गेल्या २०० वर्ष जुने दस्तावेज घेऊन सर्वोच्च न्यायालयात गेल्यात अस देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे.

हे देखील वाचा :

खा. नवनीत राणा यांना जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

‘त्या’ ४ मित्रांचा नदीत बुडून मृत्यू!, सहलीचा आनंद बेतला जीवावर

राज्य सरकार ओबीसी विरोधात काम करत आहे – माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर

 

lead storyMP Navneet Rana