मोठी बातमी ! कझाकिस्तानमध्ये विमान क्रॅश,आतापर्यंत 42 लोक मृत्यू झाला

25 प्रवशांना वाचविण्यात यश

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

अकाटू : कझाकिस्तानच्या अक्ताऊमध्ये विमानाला अपघात झाल्याने मोठी दुर्घटना  घडली आहे. समुद्रकिनाऱ्याजवळ हे विमान क्रॅश झाल्यानंतर स्फोट झाल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. विमानातील तांत्रिक बिघाडानंतर वैमानिकाने इमर्जन्सी लँडींगसाठी सूचना केली होती. मात्र, पुढे काय झालं हे अद्याप कळू शकलं नाही. दरम्यान, विमान क्रॅश झाल्याने मोठी जिवीतहानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून ख्रिसमसच्या सणादिवशीच हा अपघात झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

ग्रोन्जी हे रशियातील चेचन्या या प्रदेशात येते. दाट धुकं असल्याने वेळेवर हे विमान ग्रोन्जी विमानतळाकडे वळवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. टेंगरीन्यूज पोर्टलने या विमान अपघाताच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. काही ट्विटर हँडलवर या दुर्घटनेचे व्हिडिओ आणि छायाचित्र पोस्ट करण्यात आले आहे. या विमानात 62 प्रवासी असल्याचे समोर येत आहे. तर 5 विमान कर्मचारी असल्याची एक माहिती समोर येत आहे. या प्रवाशांमध्ये अझरबैजान आणि रशियाचे नागरीक होते.आतापर्यंत 42 लोक मृत्यू झाला असून संख्या अजून वाढू शकते. घटनास्थळी आपत्ती विभाग बचाव पथक पोहोचले असून मदतकार्य सुरू झाले आहे.

accidentChristmasPlane crash