महाराष्ट्रातील चिमूरचे भाजप आ. कीर्तीकुमार भांगडिया यांना राजस्थानमध्ये अटक; पोलिसांना मारहाण केल्याचा आरोप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सीकर: वृत्तसंस्था , 21 फेब्रुवारी – महाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्ति कुमार यांना सीकर पोलिसांनी अटक केल्याचं वृत्त समोर आलं आहे. शांतीभंग केल्या प्रकरणी त्यांच्यासह 5 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करणे व शांती भंग करण्याच्या आरोपाखाली पाच जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. आमदार कुटुंबासोबत सालासर हनुमान दर्शन करण्यासाठी जात होते.

सीकरमध्ये कल्याण कॉलेजसमोर नो एन्ट्रीमध्ये बस घुसवली म्हणून त्यांना रोखण्यात आलं होतं. त्यामुळे तेथील वाहतूक कर्मऱ्यांनी त्यांच्या विरोधात चलान कापलं होतं. बस रोखली आणि कागदपत्रं मागितली म्हणून बसमध्ये बसलेले आमदार यावर भडकले. चलान कापल्यानंतर वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करणे व त्यांचा युनिफॉर्म फाडण्याचा आरोप पोलिसांनी लावला आहे. तर ड्यूटीवर तैनात वाहतूक महिला कर्मचाऱ्यांना वाईट वागणूक व त्यांना अभद्र शब्दांचा वापर केल्याचंही सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे पोलीस कर्मचाऱ्यांनीच मारहाण केल्याचा आरोप कीर्ति कुमार यांच्या वडिलांनी केला आहे.

या प्रकरणात महाराष्ट्रातील निवासी नितेश भगडिया, त्याचे पूत्र आणि भाजप आमदार कीर्ति कुमार, श्रीकांत, अंकित आणि यवतमाळमध्ये राहणारे सुशील कोठारी यांचा समावेश आहे.

दरम्यान कीर्ति कुमार यांच्या वडिलांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, वन वेच्या मार्गावर कोठेही बोर्ड नव्हता. त्यामुळे येथे नो एन्ट्री असल्याचं लक्षात आलं नाही. तर त्यानंतर पोलीस कर्मचारी व महिला पोलीस कर्मचारी अरेरावीची भाषा करू लागले व त्यापैकी एका महिला पोलिसांने माझी कॉलर पकडली. यानंतर बाचाबाची झाली.

Kirtikumar Bhangdiya