तारांगण असूनही वाशिमकर मुकणार खगोलीय घटनांना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वाशिम १७ डिसेंबर :- वाशिम शहरातील बच्चेकंपनी आणि जेष्ठ नागरिकांना विरंगुळ्याचे एक ही स्थान नाही. हे ओळखून शहरातील इंग्रज काळातील टेम्पल गार्डनच्या जागे मध्ये जवळपास दीड कोटी रुपये खर्चून तारांगण, मोनो रेल्वे आणि बगीचा निर्माण करण्याचे काम हाती घेतले.


विधानसभेच्या निवडणूकीच्या आचार संहिते पूर्वी दीड वर्षा अगोदर घाई-घाईने उदघाटन ही झाले. दरम्यान कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन झाले आणि कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या तारांगणचे कुलूप ही उघडले गेले नाही. या काळात चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण ह्या खगोलीय घटना घडल्या पण ह्या घटना “याची देही याची डोळा पाहण्याचा ” योग वाशिमकर बच्चे कंपनीला काही आला नाही.

सध्या अवकाशात शनी आणि गुरू दोन्ही ग्रह २० वर्षांनी एकत्र आले आहेत. तर २१ डिसेंबर रोजी शनी -मंगळ आणि गुरू या तिन्ही ग्रहाची युती होणार आहे. ही घटना ८०० वर्षातून एकदा होणारी आहे. ही घटना तरी पहावयास मिळावी अशी खगोल प्रेमींची इच्छा आहे.पण कोरोना संसर्गाच्या भीतीने प्रशासन तारांगण उघडण्याच्या मनस्थितीत नसल्याने नागरिकांची निराशा झाली आहे.