भाजपचं सरकार असलेल्या राज्यात ईडीची रेड पडल्याचे दिसले नाही; बाळासाहेब थोरातांचा.

गेल्या 6 वर्षात एकातरी भाजपशासित राज्यात भाजप नेत्याच्या घरावर ईडीने छापा टाकला का?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क २४ नोव्हें :- महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरासह कार्यालयावर ईडीने छापेमारी केली आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीच्या पथकाने आज सकाळीच धाडसत्र सुरु केलं आहे. यावर राजकीय वर्तृळात प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरासह कार्यालयावर ईडीने छापेमारी केली आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी अंमलबजावणी संचलनालयाच्या पथकाने सकाळीच धाडसत्र सुरु केलं. त्यानंतर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत गेल्या 6 वर्षात एकातरी भाजप नेत्याच्या घरावर ईडीने छापा टाकला का?, असा सवाल करत ईडीने टाकलेला छाप्यापाठी राजकारण असल्याचा आरोप केला आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले की, काही केंद्रीय संस्थांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जातोय. आम्ही कायम यावर आक्षेप घेतला आहे. भारतीय जनता पक्षाचं सरकार जिथे आहे, तिथे छापेमारी झाल्याचे गेल्या सहा वर्षात दिसले नाही. ईडीसारख्या संस्थांचा राजकारणासाठी वापर केला जातोय हे दुर्दैवी आहे.

भाजपच्या ऑपरेशन कमळबाबत बोलताना थोरात म्हणाले की, भाजपचं ऑपरेशन कमळ यशस्वी होईल, असे वाटत नाही. ईडीच्या छापेमारीमुळे कोणावरही दबाव येणार नाही. उलट लोक पक्के होतील. महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष एकत्र आहेत. आम्ही एकत्र आहोत आणि अशा परिस्थितीत एकमेकांना मदत करु. काहींना वाटत होतं हे सरकार फार काळ टिकणार नाही, सरकार पडेल. परंतु आमच्या सरकारने एक वर्ष पूर्ण केलं आहे.

येत्या दोन ते तीन महिन्यात ठाकरे सरकार पडेल आणि आपले सरकार येईल, असा दावा करणाऱ्या रावसाहेब दानवे यांनाही थोरात यांनी यावेळी टोला लगावला, थोरात म्हणाले की, दानवे जे काही बोलतायत, ते एक दिवास्वप्न आहे. त्यांनी ते दिवास्वपन पाहात राहावे.

ED redPratap saranaik