अखेर कंगणा रणौत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

कंगना रनौतच्या अडचणीत वाढ, मुंबईच्या खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, २३  नोव्हेंबर :  महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी एफआयआ (FIR) नोंदवण्याचे आदेश दिल्यानंतर अभिनेत्री कंगणा रणौतविरुद्ध खार पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शीख समाजाने कंगणा विरोधात खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. शीख समाजाच्या भावना भडकवणारी पोस्ट सोशल मिडियावर केल्याप्रकरणी शीख समाजाच्या वतीने ही तक्रार करण्यात आली होती.

अभिनेत्री कंगना रणौत गेली अनेक दिवस आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. नुकताच अभिनेत्री आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शीख समुदायाविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केली होती. त्यांनतर हा वाद आणखी वाढला होता. दिल्लीतील शीख गुरुद्वारा व्यवस्थापनाने कंगनाच्या इन्स्टाग्राम पोस्टवर शीखांसाठी वापरण्यात आलेल्या भाषा आणि विचारांवर नाराजी व्यक्त केली होती. वास्तविक कंगनाने किसान आंदोलनाचे वर्णन खलिस्तानी आंदोलन असे केले होते.

 कंगनाची इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह टिप्पणी
कंगनाने इन्साट्रामवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने तिच्या मुंबईतील खारमधल्या घरासमोर शीख समुदायाकडून निदर्शने करण्यात आली. तसेच कंगनाविरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. कंगनाला मुंबईतूनच नव्हे तर राज्यातून हद्दपार करा, अशी मागणी शीख समुदायाकडून करण्यात आली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेतले. मोदींच्या या घोषणेनंतर कंगना रनौतने वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. कंगनाचे ट्विटर अकाउंट हटवण्यात आले असले तरीही ती इंस्टाग्रामच्या माध्यमातून तिची मतं व्यक्त करताना दिसते. कंगनाने इंस्टा स्टोरीमध्ये लिहिले की,”संसदेत निवडून आलेल्या सरकारच्या बदल्यात रस्त्यावरचे लोक कायदे करू लागले तर ते जिहादी देश आहे. ज्यांना हे हवे होते त्या सर्वांचे अभिनंदन”.

हे देखील वाचा :

आदिवासी महिलांना चोर समजून पोलिसांकडून बेदम मारहाण!

निमगडे दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला!

गडचिरोलीत पुन्हा वाघाच्या हल्यात महिलेचा मृत्यू !

CM UddhavDilip Walse PatilKangana Ranautlead news