लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
मुंबई डेस्क, दि. १३ नोव्हेंबर: दिवाळी २०२० च्या दिवसांमध्ये धनत्रयोदशीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरांमध्ये होणारे चढ उतार अनेकजण पाहत आहेत. पण, तरीही सोनं खरेदीसाठी किंवा चांदीची एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी पुढं येणाऱ्यांची संख्याही कमी नाही. सोन्याच्या दरांमध्ये सातत्यानं होणारे चढ उतार पाहता शुक्रवारी यावर अनेकांचीच नजर राहिली.
सोन्याचे भाव २२ कॅरेट ४९७७० रुपये तर २४ कॅरेट ५०७७० रुपये आहे. तर, चांदीचे दर प्रतिकिलो ६२,७१० रुपये इतके असल्याचं पाहायला मिळालं. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोनं आणि चांदीच्या खरेदीमध्येही वाढ होण्याची चिन्हं आहेत. सोनं खरेदीसाठी ग्राहकांची एकूण आकडेवारी समाधानकारक आहे. मुख्य म्हणजे खरेदीसाठीचे आकडे मागील वर्षांचा टप्पा गाठणार नाहीत ही बाबही लक्षात घेण्याजोगी आहे.