कोल्हापूरचा आणखी एक जवान देशासाठी शहीद.

  • कोल्हापूरातील निगवे खालसा येथे राहणारे रहिवासी होते.
  • शनिवारी रात्री राजौरी सीमेवर ही चकमक झाली. पहाटे तीनच्या सुमारास वीर जवान संग्राम शिवाजी पाटील यांना वीर मरण आलं.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

जम्मू काशीर २१ नोव्हें :- पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूरचे आणखी एक जवान शहीद झाले आहेत. कोल्हापूरचे संग्राम पाटील यांना रोजौरी येथे शत्रूशी लढताना संग्राम यांना विरमरण आले. कोल्हापूरातील निगवे खालसा येथे राहणारे रहिवासी होते. भारतीय सैन्यात हवालदार पदावर कार्यरत होते.

संग्राम यांनी आपले बालणपण खूप हालाकीत काढले होते. संग्राम हे शेतकरी कुटुंबातील होते. त्यांचे आई वडील आजही शेतीची कामे करतात. संग्राम यांच्या सैन्यात भरती झाल्यानंतर त्यांच्या घराची आर्थिक स्थिती सुधारली होती. इतके वर्षे संग्राम यांनी देश सेवा केली. पुढच्या सहा महिन्यात ते भारतीय सैन्यातून निवृत्त होणार होते. पण त्यांनी आपला प्राण भारतसेवेसाठी अर्पित केला. संग्राम यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच कोल्हापूरात पाकिस्तान विरोधात संतापाची लाट उलळली आहे.

ही बातमी समजताच गावावर शोककळा पसरली. आज सकाळपासून गावातील सर्व व्यवहार ठप्प झाले असून त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी चबुतरा बांधण्याचं कामही गावकऱ्यांनी हाती घेतलं आहे.वीर जवान शहीद संग्राम पाटील यांचा पार्थिव उद्या संध्याकाळी उशिरापर्यंत कोल्हापुरात येण्याची शक्यता असून सोमवारी लष्करी इतमामात त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत.

वीर जवान ऋशिकेश जोंधळे शहीद झाल्याची घटना ताजी असतानाच कोल्हापुर जिल्ह्यात सलग दुसरा जवान शहीद झाला आहे.शहीद जवान संग्राम पाटील याला हवालदार म्हणून बढती मिळाली होती. त्याच्या मागे आई वडील पत्नी दोन मुलं बहिणी असा परिवार आहे.