मुख्यमंत्री रात्री 8 वाजता जनतेशी साधणार संवाद, काय घोषणा करणार याकडे लक्ष?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेसोबत संवाद साधणार आहेत.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क २२ नोव्हें :– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8 वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. राज्यातील विविध प्रश्नांबाबत ही मुख्यमंत्री या उत्तर देतात याकडे ही लक्ष असेल.

लॉकडाऊन दरम्यान लोकांना आलेल्या वाढीव वीजबिलांवरुव विरोधक टीका करत आहेत. जर राज्यातील जनता ही नाराज आहे. मनसेनं सरकारला इशारा दिला आहे. तसेच मोर्चा देखील काढणार आहे. देशातील इतर राज्यांमध्ये कोरोना वाढता धोका पाहता अनेक शहरांमध्ये रात्री कर्फ्यू लागू आहे. मुंबईवरही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी काय घोषणा करतातत याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

facebook liveuddhav thackeray