Micromax IN Note 1 आणि IN 1b स्मार्टफोन आजपासून विक्रीस उपलब्ध, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क २४ नोव्हेंबर :- मायक्रोमॅक्सने नुकतेच त्यांच्या In-सिरीजमधील दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. Micromax IN Note 1 आणि Micromax In 1b अशी या दोन स्मार्टफोन्सची नावं आहेत. हे दोन्ही बजेट फोन आजपासून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. ग्राहक हे दोन्ही स्मार्टफोन्स ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट आणि मायक्रोमॅक्सइन्फो.कॉमवरील फ्लॅश सेलमधून खरेदी करु शकतात.

या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीने Micromax In Note 1 डिव्हाईस दोन व्हेरिअंटमध्ये सादर केला आहे. यामध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज स्पेस असलेल्या व्हेरिएंटची किंमत 12,499 रुपये ठेवण्यात आली आहे.

Micromax In 1B हा स्मार्टफोन 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत 7,999 रुपये ठेवण्यात आली आहे. यामधील 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज स्पेस असलेल्या स्मार्टफोनची किंमत 6,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

Micromax In Note 1 चे स्पेसिफिकेशन्स

या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यात स्पीड आणि मल्टिटास्किंगसाठी मीडियाटेक हीलियो G85T (MediaTek Helio G85T) प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज (इंटर्नल मेमरी) स्पेस देण्यात आली आहे. तसेच 5000mAH क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे जी 18 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनमध्ये 48 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे, सोबत 5 आणि दोन मेगापिक्सलचे अजून दोन कॅमेरे आहेत. तर 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा (सेल्फी कॅमेरा) देण्यात आला आहे.

Micromax In 1B चे स्पेसिफिकेशन्स

Micromax In 1B मध्ये 6.5 इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच MediaTek चा Helio G35 प्रोसेसर देण्यात आला आहे. 13 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेकंडरी कॅमेरा हा दोन मेगापिक्सलचा आहे. तसेच सेल्फीसाठी 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 5000mAH क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.