महिलांसाठी आणि आवश्यक सेवेसाठी ११२ नंबरची नवी यंत्रणा संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार -गृहमंत्री अनिल देशमुख

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

वर्धा दि २१ जानेवारी :- आरोग्य विभागाची १०८  नंबरची यंत्रणा आहे तश्याच प्रकारची ११२नंबरची यंत्रणा महिलांच्या  आवश्यक सेवेसाठी संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे ग्रूहमंत्री अनिल देशमुख यांनी आज वर्धा येथे दिली.

वर्धा येथे पोलिस अधिक्षक कार्यालयात वर्धा जिल्हाचा कायदा व सुव्यवस्था संदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीनंतर आयोजीत करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की, या ११२ नंबरच्या यंत्रणेमध्ये महिलांची छेडखाणी झाली, अपघात झाला, आवश्यक सेवा असेल अश्या सर्व सेवा या नंबरवर देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. त्यासाठी २५०० चारचाकी गाडी, २ हजार दुचाकी गाड्या घेण्यात येणार आणि त्यांना जी पी एस ने जोडण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. प्रत्येक जिल्हात यावर काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्य शासनाने १२५०० पोलिस भरतीचा निर्णय घेतलेला होता त्या संदर्भात ५३०० पोलिस भरतीची प्रक्रिया पहिल्या टप्प्यात सुरू केलेली असल्याचेही ते म्हणाले.


कोविडच्या काळात राज्य सरकारने ज्या सूचना केल्या होत्या काही लोकांनी त्याचे उल्लंघन केलेले होते. जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे नसतील त्या केसेस राज्य सरकार परत घेईल असेही त्यांनी यावेळेला पत्रकार परिषदेत सागितले. यावेळेला त्यांनी कंट्रोल रुमची देखील पाहणी केली. यावेळेला नागपूर परिकक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, वर्धाचे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, वर्धा पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर आदी उपस्थित होते.