पोस्टाच्या १० हजारांच्या गुंतवणुकीवर मिळणार १६ लाखांचा परतावा .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली डेस्क २५ नोव्हेंबर :- गुंतवणुकीच्या दिशेनं हल्ली अनेकांचाच कल दिसून येतो. त्याच धर्तीवर भारतीय पोस्ट बहुविध योजना गुंतवणुकदारांपुढं सादर करत असतं. सातत्यानं अशाच काही योजना सेवेत आणत पोस्टानं आजवर अनेकांना फायदा मिळवून दिला आहे. त्यातच आता एका नव्या योजनेनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. ज्यामध्ये 10 हजारांती किरकोळ गुंतवणूक केल्यानंतर 16 लाख रुपयांचा परतावा मिळवता येऊ शकतो.  

रिकरिंड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक केल्यास टीडीएस कापला जातो. 40 हजार रुपयांहून जास्त डिपॉझिट असल्यास वर्षाला 10 टक्के दरानं कर आकारला जातो. आरडीवर मिळणाऱ्या व्याजावरही कर आकारला जातो, पण पूर्ण मॅच्योरिटीवर मात्र कर घेतला जात नाही. ज्या गुंतवणुकदारांचा पगार करमुक्त आहे त्यांनी फॉर्म 15 G भरून टीडीएसपासून मुक्ती मिळवण्याचा पर्याय आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला खात्यात नियमित पैसे ठेवावे लागतात. असं न केल्यास प्रतिमहा 1 टक्के दरानं दंड आकारला जातो.   

indian post