मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील जेष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे निधन.

ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळे उपचारादरम्यान रात्री निधन झाला.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क 6 डिसेंबर :- मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते, रंगकर्मी,  रवी पटवर्धन यांचं निधन झालं आहे. ते ८३ वर्षांचे होते. ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना शनिवारी रात्री त्यांना श्वास घेण्यात त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याआधी नोव्हेंबरमध्ये त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता.  आज सकाळी ११ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्का केले जाणार आहेत. 

रवी पटवर्धन यांचा जन्म o6 सप्टेंबर 1937 रोजी झाला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला शोभतील अशा झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास जरब यामुळे त्यांना गावचा ‘पाटील’, ‘पोलीस आयुक्त’, ‘न्यायाधीश’ किंवा खलनायकी भूमिका साकारल्या आहेत. रवी पटवर्धनांनी दीडशेहून अधिक नाटकांत आणि २०० हून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. आरण्यक हे नाटक त्यांनी पहिल्यांदा १९७४ मध्ये रत्नाकर मतकरींबरोबर केले आणि वयाच्या ८२ व्या वर्षीही ते ह्या नाटकात तीच धृतराष्ट्राची भूमिका करत आहेत. झी मराठी वाहिनीवरील अग्गबाई सासूबाई ही त्यांची शेवटची मालिका ठरली.