यूपीएससी परीक्षेत शरण कांबळे देशात आठवा मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबात उत्साहाचे वातावरण

देशभरातून होतो आहे अभिन्दनाचा वर्षाव .

मोलमजुरी करून स्वप्न आयएएस चे केले पूर्ण. 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

ओमप्रकाश चुनारकर 

सोलापूर दि.०९ फेब्रुवारी : – शरणची हुशारी पाहून मी भाजी घेऊन गल्लोगल्ली फिरून विक्री केली तर त्याचे वडील शेतमजूर म्हणून राबले थोरला मुलगा ही पुण्यात नोकरी करत त्याला स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी दिल्लीत ठेवले. आमच्या कष्टाची जाणीव ठेवून शरणच्या जिद्दीपुढे परिस्थितीने ही शरणागती पत्करली अशी भावना शरणच्या मातापित्यांनी व्यक्त केली.

बार्शी तालुक्यातील तडवळे येथील गोपीनाथ आणि सुदामती कांबळे यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत दिवसभर दुसऱ्याच्या शेतात शेतमजुरी करून , रात्री कडबा काढण्याची सुगी करून तसेच अंगावर काम घेऊन रुपया रुपया जोडून वेळ प्रसंगी हात उसने घेऊन मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले.

काही झालं तरी मुलांच्या शिक्षणाला पैसा कमी पडू द्यायची नाही एवढं ठरवलं.थोरला मुलगा दादासाहेब बीटेक झाला तो पुण्यातील एका सॉफ्टवेअर कंपनीत दहा लाखांचे पॅकेज घेऊन अभियंता म्हणून कार्यरत आहे.तर दुसरा शरण यूपीएससी परीक्षेत देशात आठवा आला आहे.

मला माझा पोरगा काय शिकला हे माहीत नाही पण साहेब झाला एवढे मात्र कळतय.अशी भोळी भाबडी प्रतिक्रिया शरणची आई सुदामती कांबळे यांनी दिली आहे.परस्थिती बदलाच्या चमत्कार फक्त शिक्षणातूनच घडू शकतो यावर ठाम विश्वास असलेल्या कांबळे कुटुंबीयांनी काबाडकष्ट करून मुलांना शिकवलं आणि मुलांनी आई-वडिलांच्या कष्टचे सोन केलं.याचा कांबळे कुटुंबीयांना अभिमान आहे.