बिबट्याचा चक्क घराच्या वरांड्यात ठिय्या..

काही महिन्यापासून बिबट्याचा मुक्त संचार. वन विभागाने वेळीच बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी.

रवी मंडावार, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  

गडचिरोली, दि. २१ नोव्हेंबर:  बिबट्या जंगलात वावरतोय, वन्यप्राण्याची शिकार करतोय, आपला पोट भरतोय हे आपणास माहिती आहे. मात्र बिबट्या शहराच्या वर्दळीच्या ठिकाणी आणि  घरातील वरांड्यातच पाळीव प्राण्यासारखे बसून दिसत असेल तर काय होऊ शकत? हा विचार न केलेलाच बरा! होय हे सत्य असून अशीच घटना आष्ठी शहरातील पोटवार  यांच्या घरातील वरांड्यात चक्क रात्री 12:30 च्या सुमारास बिबट्याने ठिय्या मांडला असल्याचे पोटवार यांच्याकडे भाड्याने असलेल्या  भाडेकरूंना लक्षात आले. रात्री अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने ते बाहेर आले होते त्यावेळी त्यांना चक्क बिबट्या घराच्या वरांड्यात बसून असल्याचे लक्षात आल्याने भाडेकरूची तारांबळ उडाली. लगेच भाडेकरूंनी स्वताला सावरत घरातील परिवारासह आजुबाजूच्या नागरिकांना सतर्क करून वनाधिकारी यांना ही माहिती देण्यात आली.

चामोर्शी तालुक्यात काही महिन्यापासून बिबट्याचा वावर असून ठाकुरनगर येथे महिलेची बिबटयाने हल्ला केल्याने जीव गमवावा लागला लगेच त्याच गावातील  वयोवृद्ध नागरिकावर हल्ला करून गंभीर जखमी केले. नागरिकांना माहिती होताच आरडा ओरड केल्याने त्या वयोवृद्ध नागरिकाला बिबट्याच्या तावडीतून सोडविण्यात यश आले असले तरी बिबट्याची गावाच्या परिसरात घराशेजारी कोबड्या वर ताव मारने सुरु आहेच. नागरिकांच्या मनात बिबटयाची आधीच दहशत असताना आज चक्क घराच्या वरांडामध्ये ठियां मांडल्याने नागरिक दहशतीत आले आहे. सध्या शेतकऱ्यांचे धान कापणी तसेच इतर काम शेतीचे सुरु आहे त्यासाठी शेतात कामासाठी शेतमजूर ये जा करतात आणि यातच आष्टी परिसरात काही महिन्या पासून बिबट्याचे शहराच्या ठिकानीच दर्शन अधुन मधुन होत असल्याने नागरिकांना बिबटयाचा प्रचंड दहशतीचा सामना करावा लागत आहे.

आष्टी शहर हे गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर असून मध्यवर्ती ठिकाणी आहे.  आष्टी शहरापासुनच चपराळा अभयारण्य जवळ असल्याने गावात बिबट्याची सावजाच्या शोधात येत-जात असेल असा अंदाज व्यक्त केला असला तरी वन विभागाने काही महिन्या अगोदर चंद्रपूरच्या वनातील बिबट सोडल्याची माहिती समोर येत असले तरी वन विभाग अद्याप स्पष्ठ केलेले नाही. काल रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. आणि त्या बिबट्याचे आज सकाळच्या सुमारास कच्या रस्तावर बिबट्या च्या पाऊलखुणा स्पष्ट दिसून आले आहे. त्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. या आधी याच महिन्यात आष्टी येथील चामोर्शी रोडवरील लिटल हार्ट कॉन्व्हेंटच्या  इमारतीवर बिबट्या मनसोक्त संचार करताना पाहायला मिळाले सोबतच शिकारीसाठी बिबट्या कुत्र्याच्या पाठलाग करत असल्याचा एक विडीओही वायरल झाला होता. मानवी वस्तीत बिबटया धुमाकूळ घालत असून वनविभाग सुस्त आहे. बिबट्याचे मानवी हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. बिबट्याचा भीतीने आष्टीतील नागरिक, शेतकरी त्रस्त आहे. लवकरच  या बिबट्या चा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांत जोर धरू लागली असून तशी तक्रारही वन विभागाकडे केली आहे. आज घराच्या वरांड्यातच ठान मांडून बसून होता. घरात सर्वजण असल्यामुळे काही जीवितहानी झाली नसली तरी बिबट्या आक्रमक हिस्त्र प्राणी असून सध्या गाव खेड्यातही संचार वाढला असून मानवी हल्ले होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याआधीच खबरदारी वन विभागाने घेऊन बंदोबस्त करण्याची गरज आहे.

AshtiLeopardn