महिला, बालकांची तस्करी रोखण्यासाठी “ऍण्टीह्यूमन ट्राफिकिंग सेल” नेमणार, राज्य सरकारचे आदेश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दी.15 जानेवारी:- देहविक्रीच्या दृष्टीने महिलासह अन्य अनेक कारणासाठी लहान बालकांचे अपहरण करून होणारी तस्करी रोखण्यासाठी राज्य शासनाने कडक पाऊले उचलली आहेत. महिला, बालकांच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंध घालण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात “ऍण्टीह्यूमन  ट्राफिकिंग सेल” ची स्थापना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये रेल्वे पोलिस ठाण्याचाही समावेश करण्यात आलेला आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात पथक नेमण्यात येणार आहे.  पुरुष आणि महिला अशा दोन अधिकाऱ्यांसह चार कर्मचाऱ्यांचा पथकात समावेश असणार आहे. युवती महिलांच्या छेडछाड़ासाठी “निर्भया पथक” कार्यरत आहेत. यानंतर ऍण्टीह्यूमन ट्राफिकिंग पथकाद्वारे पुन्हा नवे पाऊल टाकले आहे. राज्यासह जिल्ह्यात महिला, बालकांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण गंभीर आहे. सदरची परिस्थिती लक्षात घेऊन यावर ठोस पावले उचलण्यासाठी शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे.

24 तास राहणार कार्यरत पथक

महिला व बालकांच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंध घालण्याचा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. यासाठी “ऍण्टीह्यूमन ट्राफिकिंग पथक” 24 तास कार्यरत राहणार आहे. याशिवाय हे पथक फिरते ही असणार आहे.

ऍण्टीह्यूमन ट्राफिकिंग सेल