आश्चर्य! चक्क श्वानांचा पार पडला लग्न सोहळा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सांगली २६ डिसेंबर – “या जगात कोण, काय करेल, याचा नेम उरला नाही.आणि याचा प्रत्यय सांगलीमध्ये आल्याशिवाय राहत नाही. असेच आगळेवेगळे कार्यक्रम झाल्याने एक कुतुहलाचा विषय झाला आहे .कारण हि तसेच आहे  एका कुटुंबाने चक्क श्वानांचे लग्न लावले आहे. इतकंच नव्हे तर मोठ्या थाटात या अनोखा लग्न सोहळ्याची आयोजन करण्यात आले होते. आणि टायगर व डॉली हे श्वान विवाहबद्ध झाले. विशेष म्हणजे या लग्न सोहळ्याला वऱ्हाडी मंडळीही उपस्थित होते.

सांगलीत श्वानाच्या लग्न सोहळा पार पडला आणि सध्या तो विवाह सोहळा चर्चेचा विषय ठरला आहे. कारण लग्न मंडपात वर-वधू मुलगा-मुलगी नव्हते तर चक्क श्वान होते . होय वाचुन तुम्हाला नवल वाटेलअसेलच नाही का ! हो  पण हे सत्य आहे. संजय नगर येथील विलास गगणे कुटुंबांच्या दारात हा लग्नसोहळा पार पडला आहे . गगणे यांच्या घरात कुटुंबापैकी असणारे टायगर आणि डॉली यांचा हा विवाह सोहळा कुटुंबीयांनी आयोजित केला होता. गेल्या काही वर्षांपासून गगणे यांच्या घरामध्ये वेगवेगळ्या जातीचे श्वान पाळले जातात . त्यापैकी टायगर आणि डॉली हे लग्नाच्या वयात आलेत म्हणून गगणे कुटुंबीयांनी चक्क लग्नचं लावून दिले आहे.आणि हा विवाह सोहळा त्यांनी थाटामाटात पार पाडला आहे.एखाद्या सामान्य कुटुंबातल्या वधू-वराच्या लग्न सोहळा प्रमाणे सर्व आयोजन करण्यात आलं होतं. लग्न मंडपात वधू असलेल्या डॉलीची चारचाकी गाडीतून लग्नमंडपात आगमन झाले आणि  अगदी संगीतच्या ठेक्यावर ताललात नाचणारी वऱ्हाड मंडळी आली आणि विधिवत पूजा करून  आहेर-माहेर सश्रु नयनांनी वधूची बिदाई आणि जेवणाच्या पंगती असा छोटेखानी डामडौल कार्यक्रम झाला . चि.सौ.कां.डॉली आणि चि.टायगरच्या लग्नासाठी नागरीक व बच्चे कंपनी मोठ्या संख्येने हजर होते.   या अनोख्या लग्नसोहळयाची शहरात एकच चर्चेचा विषय झाला आहे.