तेलंगणा सरकारने दीवाळीच्या आदल्या दिवशी आधीच फटाकेबंदीचा निर्णय.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

हैदराबाद डेस्क: उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर तेलंगणा सरकारने दीवाळीच्या आधीच आदेश जाहीर करत फटाक्यांवर तात्काळ बंदी आणलीय. फटाक्यांची विक्री आणि वापरावर तेंलगणात बंदी असणार आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे फटाक्यांवर बंदी आणणाऱ्या राज्यांच्या यादीत तेलंगणादेखील सामिल झालंय. 

फटाक्यांच्या विक्री आणि वापरावर तात्काळ बंदी आणावी असे निर्देश १२ नोव्हेंबरला उच्च न्यायालयाने दिल्याचे सरकारी आदेशात म्हटले आहे. फटाके विकणारी दुकान बंद करावी असेही यात म्हटले होते. पण टीआरएस सरकारी न्यायालयात आपली बाजू नीट मांडू शकली नाही असा आरोप भाजपने केलाय. त्यामुळे हिंदुंच्या भावनांचे संरक्षण करण्यास सरकार अयशस्वी झाल्याचे भाजपने म्हटलंय. 

प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून जनतेला फटाके न फोडण्याचे आवाहन करावे असे देखील उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशात म्हटलंय. राज्यात फटाके विकणाऱ्या दुकानांविरोधात पोलीस आणि प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी असं देखील यात म्हटलंय.

self diwalitelngana also band crcers