भारतीय संविधान भारताचा श्वास आहे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

विकास साळवे,पुणे

भारतीय संविधान लिहीतांना मसुदा समीतीचे अध्यक्ष विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांसमोर आकाशा एवढे विशाल आव्हान होते,परंतू डोळ्यासमोर शोषीत, पिडीत आणि पिढ्यांन् पिढ्या आपल्या न्याय हक्कापासून वंचित तथा अज्ञानी समाज होता म्हणून समोर आकाशाएवढे विशाल आव्हान जरी असले,तरीसुध्दा मनात कुठलीही शंका न ठेवता व डोक्यावरचं ओझं न मानता चालून आलेली एक संधी समजून हे आव्हान ताकदीने पेलायचं ठरवलं व पेललंसुध्दा.,त्यानंतर भारताचे संविधान लिहीण्याची संपुर्ण जबाबदारी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्विकारली,
बाबासाहेबांसमवेत अन्य काही सदस्यही या समीतीत होते,
१) के.एम.मुंशी,
२) मोहम्मद सादुलाह,
३) अल्लादी कृष्णस्वामी अय्यर,
४) गोपाळ स्वामी अय्यंगार,
५) एन. माधव राव,
(त्यांनी बी.एल. मिटरची जागा घेतली
६) टी.टी. कृष्णामचारी,
(१९४८ मध्ये मृत्यू झालेल्या डीपी खेतानची जागा त्यांनी घेतली),
परंतू त्यांच्या काही व्यक्तीगत कारणास्तव त्यांनी बाबासाहेबांना या कामात कुठलीही मदत केली नसल्याचे पुराव्यानिशी सिध्द होते.त्यात एकाने राजीनामा दिला तर एकाने या कामात उत्सुकता दाखवली नाही,तर एकाचा मृत्यू झाला,तर एक परदेशात निघून गेला,तर एक आजारी होता अशा या सगळ्या घटनाक्रमामुळे संविधान लिहीण्याची संपुर्ण जबाबदारी एकट्या विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचेवर येऊन पडली.परंतू त्यांच्या काही व्यक्तीगत कारणास्तव त्यांनी बाबासाहेबांना या कामात कुठलीही मदत केली नसल्याचे पुराव्यानिशी सिध्द होते.त्यात एकाने राजीनामा दिला तर एकाने या कामात उत्सुकता दाखवली नाही,तर एकाचा मृत्यू झाला,तर एक परदेशात निघून गेला,तर एक आजारी होता अशा या सगळ्या घटनाक्रमामुळे संविधान लिहीण्याची संपुर्ण जबाबदारी एकट्या विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचेवर येऊन पडली.
अशा परिस्थितीतही विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी २ वर्ष ११ महीने १८ दिवस जीवाचे रान करून आंतरराष्ट्रीय पातळीवर जगातल्या सगळ्याच संविधानांचा सखोल अभ्यास करून भारतात धर्मनिरपेक्ष अशी सार्वभौमत्व असलेलं लोकशाहीने ओतपोत भरलेलं भारतीय संविधान या देशाला सन्मानानं बहाल केलं. भारताची राज्यघटना अर्थात भारत देशाचे संविधान हे पायाभूत कायदा ( legal basis) आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे तथा संविधानाचे शिल्पकार तथा निर्माते आहेत.
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वातंत्र्य,समता,बंधुता व न्यायावर आधारीत राज्यघटनेचा स्वीकार केला गेला.
२६ जानेवारी १९५० पासून राज्यघटना अंमलात आली,

२९ ऑगष्ट १९४७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान समिती स्थापन झाली.अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारला गेला.यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस “भारतीय संविधान दिन” म्हणून साजरा केला जातो.
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहीलेले “भारतीय संविधान’ हे भुतलावरील जीवमुल्यांचे तथा मानवी नीतीमुल्यांचे रक्षण करणारं अनमोल असं साधन आहे,
जे लोकशाहीला उच्चकोटीचं महत्व देणारं संविधान जगाच्या पाठीवर शोधूनही सापडणार नाही,
प्रचंड संदर्भिय अभ्यासातून व अत्यंत सखोल चिंतनातून लिहीलेलं हे संविधान अतिशय उच्चकोटीच्या शिखरावर सत्यात उतरलेलं आहे,यामुळे कुणाशी स्पर्धा करीत वेळ घालविण्यापेक्षा आपणच भारतीय संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी उचलली पाहीजे..व भारतीयांनी संविधानाचा सन्मान केला पाहीजे,तरच ख-या अर्थाने “भारतीय संविधान दिन” साजरा केला असं म्हणता येईल, अन्यथा संविधानाबद्दल आपलं बेगडी प्रेम आपण दाखवतो असं होईल.
म्हणून तमाम भारतीयांनी संविधानाबद्दल सन्मान पाखून संविधानिक कृती करणे गरजेचे आहे नव्हे तर ते भारतीयांचे कर्तव्यच आहे..या भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने मी एवढ्याच सदिच्छा व्यक्त करेन की तमाम भारतीयांना भारतीय संविधानाबद्दल आदर तथा सन्मान करण्याची सुबुध्दी प्राप्त होवो..