तेलंगणातील यादाद्रिगुट्टा येथील लक्ष्मी-नरसिंहस्वामी मंदिरात कंकाडालवार कुटुंबानी घेतलं दर्शन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

ओमप्रकाश चुनारकर,

तेलंगणातील यादाद्रिगुट्टा हे मंदिर अतिशय प्राचीन मंदिर असून मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘प्रल्हाद चरित्र’, ज्यात ‘भक्त प्रल्हाद’च्या जन्मापासून ते हिरण्यकशिपूच्या वधाची कथा शिल्पकलेच्या आधारे दाखवण्यात आली आहे. ‘प्रल्हाद चरित्र’ हे सोन्याने बनलेले आहे. यामध्ये हिरण्यकशिपूला मारण्यासाठी नरसिंहाने खांब फोडून राक्षस राजाची छाती फाडल्याचं शिल्प देखील आहे.

अहेरी दि ६ जून : हैदराबादपासून ७० किमी दूर असलेल्या यादाद्रिगुट्टा येथील नऊशे वर्षे जुन्या लक्ष्मी-नरसिंहस्वामी मंदिरात अजय कंकाडालवार परिवारांनी दर्शन घेत गडचिरोली जिल्ह्यातील समस्त दिन दलित, दुबळ्या, मजूर बांधवासह शेतकऱ्यांच कल्याण होवून सुखी संपन्न समृद्धी प्राप्त होवून सुजलाम सुजलाम, होवो अशी प्रार्थना करीत मंदिर परिसरात परिवारासोबत फोटो सेशन केले आहे.

तेलंगणातील यादाद्रिगुट्टा हे मंदिर अतिशय प्राचीन मंदिर असून मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘प्रल्हाद चरित्र’, ज्यात ‘भक्त प्रल्हाद’च्या जन्मापासून ते हिरण्यकशिपूच्या वधाची कथा शिल्पकलेच्या आधारे दाखवण्यात आली आहे. ‘प्रल्हाद चरित्र’ हे सोन्याने बनलेले आहे. यामध्ये हिरण्यकशिपूला मारण्यासाठी नरसिंहाने खांब फोडून राक्षस राजाची छाती फाडल्याचं शिल्प देखील आहे.

या मंदिर परिसरासाठी दोन हजार एकर जमीन विकत घेण्यात आली असून १२०० कोटी रुपये खर्च केले जात असल्याची माहिती मंदिरातील ट्रस्टीने दिली आहे. मंदिराचे काम पूर्ण होत असून ‘टेम्पल सिटी’ म्हणून नवी ओळख मिळणार आहे.

याशिवाय या मंदिरात सुंदर वास्तुकला हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. काळ्या ग्रॅनाइटमध्ये करण्यात आलेले शिल्पकाम स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. तेलंगणामधील प्रसिद्ध श्री लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिर हे पुरातन मंदिर  पुनर्बांधणीसाठी मागील सहा वर्षे बंद होतं. ते आता भाविकांसाठी पुन्हा खुलं करण्यात आले आहे.

अतिशय मनाला प्रसन्न करणाऱ्या या मंदिराचे वैशिष्ट्य असून नक्कीच भाविकांनी दर्शन घ्याव. या मंदिरात जाऊन आल्यानंतर नवी चेतना जागृत झाली असून नक्कीच समाधान होईल अशी अपेक्षा अजय कंकडालवार परिवारांनी मित्र परिवारांसोबत संवाद केले आहे..

अजय कंकाडालावार मित्रपरिवारआदिवासी विद्यार्थी संघटनाभारतीय काँग्रेस पक्ष