दरोडेखोरांचा दोघांवर हल्ला…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

नागपूर डेस्क, दि. २० नोव्हेंबर: स्थानिक बेलतरोडीनजीक साकेतनगर येथे मध्यरात्रीला घरात घुसून दरोडेखोरांनी दोघांवर तीक्ष्ण शस्राने हल्ला चढविला. या हल्ल्यात वडील व मुलगा जखमी झाले. यावेळी वडीलांनी आरडाओरड तर मुलाने प्रतिकार केलयाने दरडोखेर पसार झाले.

जखमीमध्ये रमन काशिनाथ गिरडकर (६०) रा. साकेतनगर  यांचा समावेश आहे. ते भारतीय दुरध्वनी कारखाना विभागात मुख्य क्षेत्रीय अधिकारी पदावरुन सेवानिवृत्त झाले आहेत. ही घटना साकेत नगर येथे गुरुवारच्या उत्तररात्री २.४५ च्या सुमारास घडली. तर पहाटे ३.२० ला घटनेची माहिती मिळताच बेलतरोडी पोलिसांसह वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी घटनास्थळावरुन सब्बल व कटोनी तर घराबाहेर पडलेले धारदार शस्त्र जप्त केले. गुरुवारी गिरडकर कुटुंबीय आप-आपल्या बेडरुममध्ये झोपले होते. रात्रीला पाऊस पडल्याने त्यांनी वालकंपाऊडच्या गेटपासून घराच्या कुठल्याही मुख्य दाराला कुलूप लाले नव्हते. त्यामुळे दरोडेखोरांनी संधी साधली आणि त्यांनी शस्त्रासह वरच्या माळ्यावरील घरात प्रवेश केला. गिरडकर यांच्या घरी तळमाळ्यावर फॉक्स नावाने व्यायाम शाळा आहे.

गिरडकर कुटुंबीय गाढ झोपेत असताना चार ते पाच सशस्त्र दरोडेखोर त्यांच्या घरात घुसले. यावेळी पत्नीसह बेडरूममध्ये झोपून असलेल्या रमण यांच्यावर दरोडेखोरांनी अचानक धारदार शस्त्राने वार केला. मात्र रमण यांनी दरोडेखोरांचा चाकु हातात पकडून ठेवला. आणि जोराने आरडाओरड केली. त्यामुळे बाजूच्या बेडरूममध्ये झोपून असलेला त्यांचा मोठा मुलगा विपुल हा धावत आला असता दरोडेखोरांनी त्यांच्यावरही खुनी हल्ला केला. यावेळी झालेल्या झटापटीत दरोडेखोरांनी विपुलच्या डोक्यावर, छातीवर, कंबरेवर शस्त्राने वार करून त्यास गंभीर जखमी केले. हल्यात रमण हे सुद्धा जखमी झाले. दरम्यान आपण पकडल्या जाऊ या भीतीपोटी दरोडेखोर सब्बल, कटोनी, व धारदार चाकु सोडून पसार झाले. घाबरलेल्या गिरडकर कुटुंबीयांनी रात्रीला ३.२० च्या सुमारास पोलिसांना फोन करुन माहिती दिली.

nagpur