कोरची तालुक्यातील 18 ग्रामपंचायत पैकी 4 अविरोध तर 14 मध्ये निवडणूक.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
कोरची 13 जानेवारी :- कोरची तालुक्यातील 4 ग्रामपंचायत अतिसंवेदनशील असल्याने त्या केंद्रावर केंद्र अधिकाऱ्यांना हेलीकॉप्टर ने पाठविण्यात आले. बेस कँप कोटगुल ला सर्वांना ठेवण्यात आले असून उद्या त्यांना मतदान केंद्रावर पाठविण्यात येणार आहे. या तालुक्यातील 29 ग्रामपंचायत पैकी 18 ग्रामपंचायत मध्ये निवडणूक होणार होती. पण त्यापैकी 4 ग्रामपंचायत अविरोध आल्या. त्यात टेमली, कोसमी-2, मर्केकसा, आणि आस्वलहुडकी या ग्रामपंचायत अविरोध आल्या.
बेळगाव, बेतकाठी, बिहीटेकला, बोरी, कोचीनारा, कोहका, मसेली, नवरगाव, अल्लीटोला, कोटगुल, अरमुरकसा, सोनपूर, व नांगपूर अशा एकूण 14 ग्रामपंचायत मध्ये निवडणुका 15 जानेवारी ला होत आहेत. अशी माहिती निवडणूक अधिकारी तथा नायब तहसिलदार नारनवरे यांनी दिली.
निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त कडक असून प्रशासन सतर्क आहे.