मुंबईत तीन ठिकाणी बाॅम्बस्फोट करण्याची धमकीचा निनावी फोन

पोलीसांकडून तपास सूरू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 19, ऑक्टोबर :- मुंबईत पुन्हा 26/11 सारखा हल्ला होण्याची शक्यता आहे. मुंबईत 3 ठिकाणी बाॅम्बस्फोट करण्याच्या धमकीचा निनावी फोन हेल्पलाईन नंबर 112 वर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. मुंबईतील जुहू आणि अंधेरीसह सहारा हाॅटेल आणि विमानतळ बाॅम्ब ने उडवून देण्याची धमकी निनावी फोन द्वारे देण्यात आली आहे.

ऐन दिवाळीच्या तोंडावर आलेल्या या धमकीच्या फोनमुळे पोलिसांची झोप उडाली आहे. पोलिसांनी या तिन्ही ठिकाणी तातडीने तपास कार्याला सुरूवात केली आहे. तसेच हा धमकीचा फोन कुणी केला याची चैकशी केली जात आहे. ज्या व्यक्तींने मुंबई पोलिसांच्या हेल्पलाईनवर फोन करून बाॅम्बस्फोटाची धमकी दिली आहे, त्याचे नाव अजून समोर आलेले नाही. मात्र, या आरोपीचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहेण् यापूर्वी ही 23 सप्टेंबर ला असा मुंबईत बाॅम्बस्फोट होणार असल्याचा फज्ञेन आला होता. या घटनेनंतर मुंबईत मोठ्या प्रमाणात कडेकोट बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

हे देखील वाचा :-