लोककलाकाराच्या व्यथा मांडून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करील – आनंद शिंदे महाराष्ट्राचे लोकगायक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

कल्याण आडवली, दि. १० डिसेंबर – ढोकली ह्या परिसरात नगरसेवक कुणाल पाटील यांच्या विकासकामांचा भूमीपूजन सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे लोकगायक आनंद शिंदे आज कल्याणात आले होते ह्या प्रसंगी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना ते म्हणाले की,
कल्याण हे माझं आवडीचं ठिकाण कल्याणात लहानाचा मोठा झालो महाराष्ट्राचे लाडके गायक प्रल्हाद शिंदे यांच एक स्मारक हे कल्याण पुर्वेत आपण उभारणार आहोत तसेच विधानपरिषदेत आमदार बनण्याची संधी मिळाली तर आपण लोक कलाकाराच्या व्यथा मांडून त्याना न्याय देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत.

Anand Shinde