धान्य घोटाळ्यातील फरार उपजिल्हाधिकाऱ्याला अटकपूर्व जमानत देण्यास न्यायालयाचा नकार

  • धान्य घोटाळ्यातील फरार उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकरला अटकपूर्व जमानत देण्यास बिलोली न्यायालयाने दिला  नकार.
  • राजकीय पाठबळामुळे दीड वर्षांपासून फरार असलेल्या वेणीकरवर अद्याप निलंबनासारखी झाली नाही कारवाई.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नांदेड डेस्क ०५ जानेवारी:- नांदेड येथील धान्य घोटाळ्यातील फरार असलेले  उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर यांना  अटकपूर्व जमानत देण्यास बिलोली न्यायालयाने नकार दिला आहे. नांदेड मध्ये दोन वर्षांपूर्वी पोलिसांनी कोट्यावधी रुपयांचा धान्य घोटाळा उघडकीस आणला होता. यातील आरोपी असलेले उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर हे दीड वर्षांपासून फरार आहेत. उपजिल्हाधिकारी वेणीकर यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली होती, मात्र तो अर्ज त्यानी स्वतःहुन मागे घेऊन बिलोली इथल्या कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल  केला होता . मात्र आज बिलोली कोर्टाने वेणीकरला जामीन देण्यास नकार दिला आहे 

राजकीय पाठबळामुळे दीड वर्षांपासून फरार असलेल्या वेणीकर वर अद्याप कुठलीच कारवाई अथवा निलंबनासारखी कारवाई झालेली नाही, त्यामुळे वेणीकरचे लागेबांधे किती वर पर्यंत पोहोचलेत आहे याचा अंदाज येऊ शकतो.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद रफिक यांनी वेणीकर यांच्या जामीन अर्जावर न्यायालयातआक्षेप घेतला होता . या घोटाळ्याची व्याप्ती आता आणखीन वाढण्याची शक्यता आहे. पुन्हा प्रशासन लक्ष घालणार कि राजकीय दबावात राहणार हा प्रश्न अनुउतीर्ण आहे .