गुरूजींचे कष्ट ‘अपार’, कामांचा वाढला भार;

उद्दिष्टपूर्तीसाठी धावपळ सुरू , केवळ ५५ टक्के काम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांचा नॅशनल आयडी (अपार) बनविणे बंधनकारक केले असून सर्व माध्यमांच्या शाळांच्या मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांची अपार आयडी काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत तालुकास्तरावरील गटशिक्षणाधिकारी तसेच केंद्रप्रमुखांकडून सातत्याने आढावा घेतला जात आहे. या कामाला गती आलेली असून आतापर्यंत  जिल्ह्यात सरासरी ५५ टक्क्यांपर्यंत ‘अपार’चे काम झाले आहे.

एकीकडे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा तर दुसरीकडे ‘अपार’च्या माध्यमातून गुरुजींवर अशैक्षणिक कामांचा ताण वाढल्याचे दिसून येत आहे. ‘अपार’ची कामे लवकर करावीत, यासाठी शिक्षण विभागाकडून पाठपुरावा वेगाने केला जात आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार ‘वन नेशन, वन स्टुडन्ट आयडी’ बनवण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला ‘अपार’ अर्थात ऑटोमेटिक पर्मनंट अकॅडमिक अकाऊंट रजिस्ट्री क्रमांक दिला जाणार आहे. सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा अपार आयडी काढला जात आहे. जिल्ह्यात सर्व व्यवस्थापनाच्या मिळून एकूण १ हजार ९९४ शाळा असून, विद्यार्थी संख्या १ लाख ८७ हजार २४० रूपये एवढी आहे. ‘अपार’ आयडी काढण्याचे काम जवळपास ५५ टक्केच्यावर झाले आहे. काही विद्यार्थ्यांचे आधार व पालकांच्या आधारच्या नावात फरक असल्याने अपार आयडी काढण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यात दुरुस्ती केल्यानंतरच अपार आयडी निघणार आहे. विद्यार्थ्यांचे अपार आयडी काढण्याचे काम गतीने सुरू आहे. सर्व शाळांना विद्यार्थ्यांचे अपार आयडी काढण्याच्या सूचना गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या आहेत.

पालकांना भेटून काही विद्यार्थी व पालकांचे आधारकार्ड अपडेट करणे अत्यावश्यक झाले आहे. या सर्व कामामुळे शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचा बोजा वाढला आहे. याशिवाय दैनंदिन उपस्थिती, शालेय पोषण आहार, यू-डायस प्लस, सरल, चाचणीचे गुण ऑनलाइन भरणे अशी विविध स्वरूपातील कामे शिक्षकांना करावी लागत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवावे की अशैक्षणिक कामे करावीत, असा प्रश्न शिक्षकांतून न विचारला जात आहे.

सर्व माध्यमांच्या शाळांच्या मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांची अपार आयडी काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत तालुकास्तरावरील गटशिक्षणाधिकारी तसेच केंद्रप्रमुखांकडून सातत्याने आढावा घेतला जात आहे.. विद्यार्थ्यांचा अपार आयडी तयार करण्यासाठी पालकांची पूर्वसंमती घेऊन फॉर्म भरून घ्यावे लागत आहेत. एवढे सर्व करूनही विद्यार्थ्यांचे शालेय रेकॉर्ड व यू-डायस प्रणालीवरील नाव आधारवरील नावाशी जुळत नाही. आधार अपडेट करणे गरजेचे आहे.  पालक रोजगारासाठी स्थलांतरित झाले असून, त्यांच्याशी संपर्क करावा लागत आहे.