लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
कुरखेडा 8 जुलै :- सततच्या मुसळधार पावसामुळे कुरखेडा तालुक्यातील उराडी-कढोली मार्गावर मोठे आंब्याचे झाड कोसळले त्यामुळे तब्बल 30 तास वाहतूक ठप्प होती. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या वाहनाने नागरिक ये जा करू शकत नव्हते, ही बाब उराडी येथील युवारंगच्या सदस्यांना कळताच युवारंग चे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते राधेश्याम दडमल व युवारंग उराडी शाखेचे अध्यक्ष साहिल वैरागडे यांच्या नेतृत्वात पडलेल्या मोठ्या आंब्याच्या झाडाची छाटणी करून रास्ता मोकळा करून वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.
याप्रसंगी युवारंगचे सदस्य सुरज रणदिवे, अस्मिर दडमल, पपू रस्से, विकास चौधरी, सुधीर चौधरी, अंकित मोहुर्ले,दिनेश रस्से, वैभव धाडसे,अंकुश गुरुनुले, अभिजित रंधये, शरद चौधरी, संदीप देविकार, तनुज वैरागडे, प्रणय चौखे, आदी उपस्थित होते.
हे देखील वाचा :- https://loksparsh.com/top-news/accused-arrested-for-demanding-rs-1-crore-at-nagpur/27517/