लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथील पदव्युत्तर शैक्षणिक विभागाने वाचन संकल्प महाराष्ट्राचा अंतर्गत वाचन पंधरवडा उपक्रमाचे आयोजन केले आहे. या उपक्रमाच्या भाग म्हणून १ जानेवारी २०२५ रोजी सामुहिक वाचन आणि वाचन कौशल्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
सदरची कार्यशाळा दि. १ जानेवारी २०२५ रोजी, दुपारी १२.३० वाजता गोंडवाना विद्यापीठाच्या नवे सभागृहात आहे. कार्यशाळेत वाचन कौशल्य आणि सामुहिक वाचन या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
हे पण वाचा,
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मिळणार नामंकित इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळांमध्ये प्रवेश