रामदेव बाबाचे महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान ! सर्वत्र संतापाची लाट !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

ठाणे, 25 नोव्हेंबर :-  योगगुरू म्हणून प्रसिद्ध पावलेले बाबा रामदेव ठाणे येथील एका कार्यक्रमात महिलांबद्दल आक्षेपार्ह बोलले , त्यामुळे सर्वत्र एकच संताप व्यक्त केला जात आहे. ठाणे येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात योगगुरू बाबा रामदेव यांनी महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे.

बाबा रामदेव असे म्हणाले की ‘ महिला साडीमध्ये चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये चांगल्या दिसतात, माझ्या नजरेने पाहिलं तर काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात.’ त्यांच्या या विधानामुळे एकच खळबळ माजली असून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी रामदेव बाबांचा निषेध केला असून रामदेव बाबा पुण्यात आल्यावर त्यांच्या तोंडाला काळे फासणार असे आव्हान रामदेव बाबांना दिले आहे. त्याचबरोबर त्या पुढे अशाही म्हणाल्या की, अमृताताई समोर रामदेव बाबांनी हे विधान केले आहे. खरं तर अमृताताईनी व्यासपीठावरच रामदेव बाबांच्या कानाखाली ओढली पाहिजे होती. रामदेव बाबांच्या मेंदूला रक्त पुरवठा होत नसल्याने त्याचे खाली डोके वर पाय केले पाहिजेत. असेही त्या पुढे म्हणाल्या.

हे देखील वाचा :-

महानगरपालिकेची कर वसुलीसाठी धडक मोहिम सुरु – तीन मालमत्ता सील व एक ड्रेनेज खंडन

संजय राऊत यांना हायकोर्टाचा दिलासा… ईडीचा अर्ज फेटाळला

ramdev babathane