शिवसेना अहेरी विधानसभा तर्फे नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी संजय मीना यांचे स्वागत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली २३ऑगस्ट:  गडचिरोली जिल्ह्यात नव्याने रुजू झालेले  जिल्हाधिकारी संजय मीना  यांना पुष्पगुच्छ देऊन  शिवसेना अहेरी विधानसभा तर्फे  स्वागत करण्यात आले तसेच अहेरी विधानसभा शिवसेना सहसंपर्कप्रमुख विलास कोडापे यांनी उपस्थित सर्व पदाधिकारयांचा परिचय करून दिला  .

तसेच शिवसेना पदाधिकार्यांनी जिल्हातील विविध समस्येबाबत  जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा केली .यावेळी त्यांनी सर्व समस्या मार्गी लावण्याचे चर्चे दरम्यान आवर्जून सांगितले.

या प्रसंगी अहेरी विधानसभा जिल्हाप्रमुख रियाज शेख, उपजिल्हाप्रमुख अरुण धुर्वे, विधानसभा संघटक बिरजू गेडाम, संघटिका पौर्णिमा  ईष्ठाम, अहेरी तालुकाप्रमुख प्रफुल येरणे, मनिष ईष्ठाम  आदींची उपस्थिती होती .

 

हे देखील वाचा :

भानामतीच्या संशयावरून दलित महिला – वृद्धाना दोरीने बांधून मारहाण

 

 

जगदेवरामजी चे जनजाती करीता कार्य हे ईश्वरीय: प्रकाश गेडाम यांचे प्रतिपादन

 

वाघांचा बंदोबस्त करण्यासाठी नागरिकांची वनसंरक्षक कार्यालयावर धडक

 

collectorgadchirolishivsena