थायलँड ओपनमध्ये सहभागी होण्यासाठी बँकॉकला गेली असून तिथेच तिला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे.
12 ते 17 जानेवारीदरम्यान योनेक्स थायलंड ओपन खेळवलं जाणार होतं.
कोरोनाची लागण झाल्यामुळे सायनाच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
सायना नेहवालला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे बऱ्याच काळापासून आंतरराष्ट्रीय सामने रद्द करण्यात आले होते. त्यानंतर हळूहळू सर्व गोष्टी पुर्वपदावर येत आहेत. अशातच आता सायना नेहवाल थायलँड ओपन सुपर 1000 टुर्नामेंटमध्ये सहभागी होणार आहे.
12 ते 17 जानेवारीदरम्यान योनेक्स थायलंड ओपन खेळवलं जाणार होतं. यानंतर आता 19 ते 24 जानेवारीदरम्यान टोयोटा थायलंड ओपन आणि 27 ते 31 जानेवारीदरम्यान बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्स होणार आहेत परंतु, आता कोरोनाची लागण झाल्यामुळे सायनाच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे.
सायनाने ट्रेनर आणि फिजियोला भेटण्याची परवानगी न दिल्यामुळे वर्ल्ड बॅडमिंटन महासंघावर (BWF) टीका केली होती. खेळाडूंना याबाबत आधीच माहिती द्यायला पाहिजे होती, असं सायना नेहवाल म्हणाली होती. थायलंडमध्ये सायनाला तिच्या सपोर्ट स्टाफला भेटण्याची परवानगी मिळाली नव्हती.