ट्रम्प विरोधातील महाभियोगाचं समर्थन.

10 रिपब्लिकन खासदारांकडूनही समर्थन.

फेसबुक, ट्विटर अन् यूट्यूबकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्या खात्यावर बंदी.

Snapchat कडून डोनाल्ड ट्रम्प यांच्या अकाऊंटवर कायमची बंदी!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली डेस्क 14 जानेवारी:- अमेरिकी संसदेवर हल्ला करण्यासाठी आपल्या समर्थकांना उकसवल्याचा आरोप डेमोक्र्ॅट्सकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर करण्यात आला आहे. अमेरिकी संसदेवर ट्रम्प समर्थकांनी केलेल्या हल्ल्यात 5 लोकांचा जीव गेलाय. त्यामुळे अमेरिकेच्या इतिहासात तो दिवस काळा दिवस ठरला आहे. ट्रम्प यांच्याविरोधातील प्रस्तावाचं समर्थन 222 डेमोक्रॅटिक्सनी तर केलं आहेच. सोबतच रिपब्लिकन पक्षाच्या 10 आमदारांनीही महाभियोग प्रस्तावाला समर्थन दिलं आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पडत्या काळात मोठ्या विरोधाचा सामना करावा लागत आहे. ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच असे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत, ज्यांच्याविरोधात एकाच कार्याकाळात 2 वेळा महाभियोग प्रस्तावावर समर्थन. अखेरच्या दिवशी ट्रम्पविरूद्ध महाभियोग प्रस्तावही मंजूर झाला आहे. रिपब्लिकनच्या 10 सभासदांनी महाभियोग प्रस्तावाला पाठिंबा दर्शविला आहे.

अमेरिकन संसदेत झालेल्या हिंसाचारानंतर फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोशल अकाऊंटवर एका आठवड्यासाठी बंदी घातली आहे. या बंदीमागे हिंसाचार पसरण्याची शक्यता व्हिडिओ प्लॅटफॉर्मने वर्तवली आहे.

DolnadUS