पुतीन यांची गंभीर आजाराशी झुंज, रशियाचं अध्यक्षपद सोडण्याची शक्यता.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन पुढील वर्षी जानेवारीत राष्ट्राध्यक्षपद सोडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार पुतीन पार्किंसन्स आजारानं ग्रासलेले आहेत. त्यामुळेच ते राष्ट्राध्यक्षपद सोडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पुतीन यांनी राजीनामा द्यावा, अशी इच्छा त्यांची गर्लफ्रेंड जिम्नास्केट अलाना कबाइवा आणि त्यांच्या दोन मुलींनी केली आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांमध्ये पुतीन गंभीर आजारी असल्याचं पाहायला मिळत आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या अहवालात मॉस्कोचे राजकीय शास्त्रज्ञ वलेरी सोलोवी यांच्या हवाल्यानं ही माहिती देण्यात आली आहे.

सोलोवी म्हणाल्या, “पुतीन यांचं एक कुटुंब आहे, त्यांच्यावर त्यांचा खूप प्रभाव आहे. ते जानेवारीत राष्ट्राध्यक्षपद सोडण्याची सार्वजनिकरीत्या घोषणा करू शकतात. रशियन राष्ट्रपती पार्किसन्सने ग्रस्त असून, हल्लीच्या छायाचित्रांमधून त्यांच्यामध्ये आजाराची लक्षणे दिसत आहेत, असेही त्यांनी सांगितले.