पाकिस्तान मध्ये बनतोय विचित्र कायदा; १८ वर्षावरील तरुण तरुणीचे लग्न न झाल्यास पालकांना दंड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वृत्तसंस्था : 18 वर्षावरील कुठल्याही तरुण-तरुणींचे लग्न न झाल्यास पालकांना दंड बसणार आहे. पाकिस्तानमध्ये हा विचित्र कायदा आणण्याची तयारी सुरू आहे. या कायद्याचे विधेयकही मांडण्यात आले आहे.

पाकिस्तानच्या सिंध प्रांतात आ. सय्यद अब्दुल रशीद यांनी विधानसभेत आणि अनिवार्य विवाह कायद्याचा एक मसुदा तयार केला आहे. या कायद्यानुसार सिंध प्रांतातील कुठल्याही १८ वर्ष पूर्ण झालेल्या तरुण किंवा तरुणीचे लग्न न झाल्यास त्यांच्या पालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. समाजातील बलात्कार, अनैतिक व्यवहार आणि गुन्हे कमी करण्यासाठी हा कायदा आणत असल्याचे सांगण्यात येत आहे.

या कायद्यानुसार पालकांना आपल्या पाल्याचे लग्न का झाले नाही. याचे स्पष्टीकरण देणारे शपथपत्र द्यावे लागणार आहे. तसेच शपथ पत्र देण्यास जे पालक असमर्थ ठरतील त्यांना ५०० रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

आ. रशीद म्हणाले की, समाजात लहान मुलांचे लैंगिक शोषण, बलात्कार, अत्याचाराच्या घटना घडत आहेत. त्या रोखण्यासाठी मुस्लिम महिला आणि पुरुषांना लग्नासाठी १८ वर्ष वय निर्धारित करण्यात आले आहे. १८ वर्षे पूर्ण झालेल्या तरुण-तरुणींच्या लग्नाची जबाबदारी ही त्यांच्या पालकांची आहे. असेही आ. रशीद सय्यद म्हणाले. हा कायदा जर पारित झाला तर समाजात गुन्ह्याचे प्रमाण कमी होईल. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

हे देखील वाचा : 

बुरशीजन्य आजार… म्युकरमायकोसीस!

(DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

कोल्हापूर महानगरपालिकेत ८५ वैद्यकीय जागांसाठी भरती

lead storypakistan law