मेरिका मॉडर्ना कंपनीकडून तयार करण्यात येणाऱ्या लसीचे 10 कोटी डोस खरेदी करणार आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वॉशिंग्टन डेस्क 12 डिसेंबर:- अमेरिकेत फायझर कंपनीच्या कोरोना व्हॅक्सिनला परवानगी देण्यात आली आहे. आपत्कालीन वापरासाठी फायझरच्या ‘लस’ला अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने मान्यता दिली आहे. अमेरिकेच्या औषध विभागाने (एफडीए) फाइजरला तातडीने फायझर लस वापरण्यास मान्यता दिली आहे. आजपासून अमेरिकन नागरिकांना लस दिली जाऊ शकते.
न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, ही लस १६ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांवर आपत्कालीन परिस्थिती वापरावी असे, या पॅनलमध्ये ठरवण्यात आले आहे. एफडीए पॅनेलमध्ये लस सल्लागार, वैज्ञानिक, संसर्गजन्य रोग डॉक्टर आणि तज्ज्ञांचा समावेश होता. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी ८ तासाच्या महत्त्वाच्या बैठकीत एफडीए पॅनेलच्या सदस्यांनी फायझर लसीच्या वापराला परवानगी दिली असल्याने ब्रिटन, कॅनडानंतर तात्काळ अमेरिकेतही या लसीच्या वापरास परवानगी देण्यात आली आहे.
कोरोनामुळे आतापर्यंत अमेरिकेत २ लाख ९२ हजार नागरिकांचा बळी गेला आहे. त्यामुळे अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी कोरोना लसीकरण धोरणाला प्राधान्य दिले होते. त्यानुसार आता कोरोना लस उपलब्ध झाली आहे. सुरूवातीला सुमारे २० लाख आरोग्य सेवक आणि वयोवृद्ध नागरिकांना ‘लस’साठी प्राधान्य दिले जाणार आहे.
हे पण वाचा :-गडचिरोली जिल्हयातील ३६२ ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर
इस्रायलमध्ये २७ डिसेंबरपासून लसीकरण
जगात कोरोनाचा फैलाव सुरू होऊन वर्ष झाल्यानंतर कोरोनावरील लसीकरणाला ब्रिटन हा देश पहिला ठरला तर त्यानंतर कॅनडा सरकारने देखील देशाने देखील कोरोना लसीच्या वापराला मंजूरी दिली. आता या देशाच्या यादीत इस्रायलचाही समावेश होणार असून तेथील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, “इस्रायलमध्ये २७ डिसेंबरपासून कोरोनापासून बचावासाठी नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे”, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी केली आहे.
कॅनडाकडूनही फायझर-बायोएनटेकच्या लसीला मंजुरी
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी दिलेल्या माहितीनुसार कॅनडामध्ये या महिनाभरात लसीचे २ लाख ४९ हजार डोस मिळणार आहे. कॅनडा सरकारने लसीच्या एकूण २ कोटी डोसची खरेदी केली आहे. जी कॅनडातील एक कोटी नागरिकांच्या लसीकरणासाठी उपयुक्त ठरणार आहे.तर कॅनडामध्ये लसीचा पुरवठा झाल्यानंतर लगेच लसीकरणालाही सुरुवात होण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा :- कोरिओग्राफर रेमो डिसूझा यांना हृदयविकाराचा झटका; आयसीयु मध्ये दाखल