अमेरिकन अध्यक्षपदासाठी आज (03 नोव्हेंबर) मतदान होणार असून हा निवडणुकीचा शेवटचा टप्पा आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वॉशिंग्टन : अमेरिकन अध्यक्षपदासाठी आज (03 नोव्हेंबर) मतदान होणार आहे. हा निवडणुकीचा शेवटचा टप्पा असून अमेरिकेचा पुढील अध्यक्ष कोण होणार? याचा फैसला होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार जो बायडेन (Joe Biden) यांची बाजू अधिक भक्कम असून ही निवडणूक अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) हरू शकतात. डोनाल्ड ट्रम्प ही निवडणूक हरले तर 1992 नंतर पहिल्यांदाच असं होईल की, विद्यमान राष्ट्राध्यक्ष दुसऱ्यांदा निवडून आले नाहीत.
विशेष म्हणजे या सर्व राज्यांमध्ये 2016 च्या निवडणुकीत ट्रम्प यांनी विजय मिळवला होता. सीएनएन पोलनुसार एरिजोना, मिशिगन उत्तर कॅरोलिनामध्ये बायडेन जिंकतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या राज्यातही 2016 च्या निवडणुकीत ट्रम्प जिंकले होते.
एबीसी/वाशिंगटन पोस्टचा सर्वे बायडेन यांच्या चिंता वाढवणारा आहे. एबीसी/वाशिंगटन पोस्टच्या पोलनुसार बायडेन फ्लोरिडामध्ये 48 ते 50 टक्के मतांनी पिछाडीवर आहेत. पेन्सिल्वेनियामध्ये बायडेन 44 ते 51 टक्के मतांनी आघाडीवर आहेत.
डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन हे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात राष्ट्रीय पातळीवर 8 गुणांनी आघाडीवर आहेत. हिल न्यूज वेबसाइटच्या अहवालानुसार, फॉक्स न्यूजच्या सर्वेक्षणात संभाव्य मतदारांपैकी 52 टक्के लोकांनी माजी उपाध्यक्षांना पाठिंबा दिल्याचं समोर आलं आहे तर ट्रम्प यांना 44 टक्के पाठिंबा मिळाला आहे.