बुधवारी झालेल्या हिंसेनंतर ट्विटरने ट्रम्प यांचं अकाउंट 12 तासांसाठी ब्लॉक केलं होतं.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली डेस्क, 9 जानेवारी :- अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या हजारो समर्थकांनी बुधवारी कॅपिटल भवनवर हल्ला केला. या घटनेत अनेक लोकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर, अशाप्रकारची हिंसा पुन्हा होऊ नये यासाठी सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म ट्विटरने मोठं पाऊल उचललं आहे. ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाउंट कायमचं बंद केलं आहे.
बुधवारी झालेल्या हिंसेनंतर ट्विटरने ट्रम्प यांचं अकाउंट 12 तासांसाठी ब्लॉक केलं होतं. त्याशिवाय त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन अनेक ट्विट्सही हटवण्यात आले होते. परंतु आता ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाउंट पूर्णपणे सस्पेंड केलं आहे. अशाप्रकारची हिंसा पुन्हा होऊ नये, यासाठी त्यांचं अकाउंट सस्पेंड केल्याचं कारण ट्विटरने दिलं आहे. हिंसाचाराला उद्युक्त करण्याच्या जोखमीमुळे आम्ही त्याचं अकाउंट कायमस्वरूपी सस्पेंड केलं आहे. ट्विटर नियमांचं उल्लंघन केल्यानं हे पाऊल उचलल्याचं, ट्विटरने स्पष्ट केलं आहे.