Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बेवकुफांचे भाषाशास्त्र आणि ’राफेल लाभार्थी’ -ज्ञानेश वाकुडकर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

नागपूर 16 जुलै :-  बेवकुफांचे भाषाशास्त्र हा विषय पुढील काळात भारतीय विद्यापीठातून शिकवायला हवा, अशी परिस्थिती देशात निर्माण झाली आहे. भाषा, संस्कृती आणि इतिहासाचे उध्वस्तिकरण गेल्या आठ दहा वर्षाच्या काळात एवढ्या झपाट्याने सुरु झाले आहे, की सभ्यता, संस्कृती जपणारा एक भारत नावाचा देश या भूतलावर अस्तित्वात होता, यावर विश्वास ठेवणे कठीण जावे!

परवा आपल्या संसदेत हास्यास्पद गोष्टी घडल्या. काही साधे शब्द देखिल असांसदीय म्हणून जाहिर करण्यात आलेत. म्हणजे ते संसदेत वापरता येणार नाही. किंवा कुणी वापरले तरी ते कामकाजातून काढून टाकले जातील. ही गमतीशीर म्हणा की लज्जास्पद म्हणा, पण विचित्र गोष्ट आहे. सध्याचे सत्ताधारी एवढे का घाबरतात? कुणी बोलले याची जर खरंच लाज वाटत असेल तर तसले धंदे करतात कशाला? बरं, हे स्वतः मात्र कुणाला काहीही बोलतात. ज्या पदावर बसले आहेत, त्याची जराही प्रतिष्ठा ठेवत नाहीत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शब्दांना स्वतःचे तसे स्थायी अर्थ नसतात. जे असतात ते परिस्थिती नुसार बदलत असतात. कुणी वापरले, कुणासाठी वापरले, कोणत्या संदर्भात वापरले, यावरून शब्दांना नवे अर्थ प्राप्त होत असतात. चोर, डाकू, अपराधी यांची स्वतःची स्वतंत्र भाषा असते. पोलिसांचीही वेगळी आणि सांकेतिक भाषा असते. मात्र हे सध्याच्या राज्यकर्त्यांना माहीत नसावे असे वाटते. म्हणूनच ते स्वतःच्या सावलीला देखील भितात. मागे एका टीव्ही चॅनेलवरील चर्चेच्या वेळी अखिलेश यादव यांनी एका महिला पत्रकाराला उद्देशून अगदी सहजरित्या ’आप बहुत इमानदार पत्रकार है’ असा उल्लेख केला होता. आणि ती पत्रकार नेमकी काय लायकीची आहे, याची जनतेला तर कल्पना होतीच, पण खुद्द पत्रकार महिलेला देखील होती. जनता आपल्या बद्दल काय बोलते हे तिला चांगले ठाऊक होते. आणि म्हणूनच ’इमानदार पत्रकार’ हे विशेषण तिला झोंबले. साहजिकच ती चिडली. ’खाई त्याला खवखवे’ असा तो प्रकार आहे. आता सांसदीय भाषेतून इमानदार हा शब्द देखिल वगळण्यात येणार का? साराच वेड्यांचा बाजार आहे!

असो, यांनी कितीही शब्द बाद केलेत तरी आपली नवी डिक्शनरी लगेच तयार होणार बघा. अशा खास लोकांच्या सन्मानासाठी हे काही नविन शब्द बघा..!

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

राफेल पंथी, राफेल जिवी, राफेल लाभार्थी, राफेल बंधू, कोविड लाभार्थी, शववाहिनी सेवा मॅनेजर, सायलेंट नत्थु, पुडी बहाद्दर, चुना मास्टर, चुना व्यापारी, अखिल भारतीय चुना लगावो अभियान, चुना धर्मी, मिस्टर थापा, नोट विरप्पन, छप्पन भोगी, भाषण भिकारी, मानस झंडू, वसूल धर्मी, पीकअप मास्टर, किचडजन्मी, किचडधर्मी, किचडजीवी, किचड संस्कृती, किचडप्रेमी, किचड शॉप्पी, नोटबंदी स्मारक, गोबर गौरव महासंघ, उलटा मेंदू, फ्यूज बल्ब, उलटा जाकीट, जाकीट दादा, भारतीय राजपक्षी, डबल राजपक्षी, देशी राजपक्षी, गोटा भाया – मोटा भाया, कचरा उठाव पार्टी, डम्पिंग यार्ड, भंगार मास्टर, पार्टी फोडो दस्ता, छुपे अंग्रेज, रिमोल्ड अंग्रेज, तोडफोड मास्टर, तोडफोड एजंट, नफरत मॉल, ड्रग ट्रॅव्हल्स, ड्रगयात्री, नशा यात्री, हिस्सा संस्कृती, अपना झाकू, अपना झाको संस्कृती, माईंड मिलावट, अंबानी डिलिव्हरी बॉय, कमिशन लव्हर्स, टक्का भक्त, टक्का भक्ती, टक्का महोत्सव, विक्री एजट, खोटे बंधू, इव्हेन्ट मास्टर, अंबा ऑर्केस्ट्रा, अदा सर्कस, जेब क्लिनर, फेको ऑलिम्पिक, ’फेको’ ट्वेंटी ट्वेंटी, तडी-राम, मख्खन भाई, ढक्कन भाई.. वगैरे वगैरे..

असो.. तूर्तास एवढेच !

ज्ञानेश वाकुडकर
अध्यक्ष
लोकजागर 9822278988

हे देखील वाचा :-

धक्कादायक: महाराष्ट्रात १७ महिन्यांत तब्ब्ल २२ हजार ७५१ बालमृत्यू. https://loksparsh.com/top-news/information-comes-out-in-rti-by-samarthan-of-highest-child-deaths-in-maharashtra-state/27615/

गडचिरोलीत महाभयावह विदारक पूरस्थिती.

Comments are closed.