१२ वर्षीय मुलीवर एका नराधमाने केला अत्याचार
अमरावती दि ०६ फेब्रवारी :- तिवसा तालुक्यातील १२ वर्षीय गोरगरीब अनुसूचित जमातीच्या मुलीवर एका ३४ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना तिवसा पोलीस ठाण्या अंतर्गत घडली असून पिडीतीच्या आईने तक्रार दाखल केल्याने घटना उघडकिस आलेली आहे . पोलीस विभागांनी पिडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल करून तासाभरातच आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे, सदर घटना राज्यभरात कुठेना कुठे घटना होत असल्याने पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. सदर घटनेतील आरोपी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे.
अत्याचार करणारा आरोपी हा आणि पिडीत मुलगी एकाच गावातील असून तिला गावाजवळील एका निर्मनुष्य ठिकाणी नेऊन तिच्यावर बळजबरीने अत्याचार आरोपीने केला आहे. सदर घटनेची तक्रार मुलीच्या आईने तिवसा पोलीस ठाण्यात दिलेली असून पीडित मुलगी ही ७ व्या वर्गात शिक्षन घेत आहे.घटनेची तक्रार होताच सदर आरोपीला तासाभरातच अटक करण्यात आली असून विठ्ठल कामठे आरोपीचे नाव आहे. तिवसा पोलिसांनी आरोपी विरुद्ध बलात्काराच्या कलम ३७६,(३),सह कलम ४,६,पोस्को सह अनुसूचित जाती जमाती अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे,तर या घटनेनंतर अमरावती जिल्ह्यातील संतापाची लाट पसरली आहे,तर आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकात जोर धरू लागली आहे.
Comments are closed.