Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

20 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

विरार पोलिसांकडून दोन नराधमांना अटक 

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

विरार, दि. २४ मार्च : विरार मध्ये एका २० वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली असून विरार पोलिसांनी अवघ्या काही तासांत याप्रकरणी दोन आरोपिंना अटक केली आहे.

यश शिंदे आणि धीरज सोनी अशी या आरोपिंची नावे आहेत. बुधवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास पीडित तरुणी ही आपल्याला प्रियकर मित्रासोबत विरार पूर्वेच्या साईनाथ नगर येथील डोंगराळ भागात फिरण्यासाठी गेली होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी जंगलात कोणी नसल्याचा फायदा घेत तेथे दबा धरून बसलेल्या दोन आरोपिंनी तरुणीचे फोटो काढले व ते वायरल करण्याची धमकी देत अत्याचार केला..या सर्वांस विरोध करणाऱ्या तिच्या मित्राला मारहाण करून कपडे काढले हाथ पट्ट्याच्या साहाय्याने बांधून व तरुणीवर जबरदस्तीने बलात्कार केला…

तिचा प्रियकर नग्न अवस्थेत डोंगराखाली आला असता काही नागरिकांनी त्याला पाहिले व त्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला. पीडित तरुणी व तिच्या प्रियकराने विरार पोलिसांना दिलेल्या तक्रारीनंतर विरार पोलिसांनी सामूहिक बलात्कारासह, लूट, मारहाण अश्या विविध कलमन्वये गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपिंना अटक करण्यात आली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आज त्यांना वसई सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २७ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Comments are closed.