Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेला आरोपी १२ तासांच्या आत पुन्हा गजाआड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मनोज सातवी,

वसई, दि. ४ डिसेंबर: मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालया अंतर्गत मांडवी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेल्या एका सराईत आरोपीला १२ तासांच्या आतच पुन्हा पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. अब्दुल रेहमान ताहीर बडु, (२८) असे या आरोपीचे नाव असून, त्याच्यावर दरोडा, खुनाचा प्रयत्न, घरफोडी, मंदिरामध्ये चोरी, मोबाईल चोरी असे अनेक गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल आहेत. पोलिसांना थकवा देऊन पळालेल्या १२ तासांच्या आतच त्याच्या पुन्हा मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

वसई तालुक्यातील नालासोपाऱ्याच्या पूर्वेला असलेल्या पेल्हार येथे राहणारा आणि होटल मध्ये डिलेवरी बॉयचे काम करणारा अब्दुल रेहमान ताहीर बडु या २८ वर्षाच्या आरोपीला शनिवारी एका घरपोडीच्या आरोपात पकडले होते. त्याला न्यायालयात हजर केले असता ५ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.मात्र पोलीस ठाण्यात आणुन तपास सुरू असताना काल रात्री ८.३० वाजताच्या सुमारास पोलिसांना चकवा देवुन पोलीस ठाण्याच्या पहिल्या माळयावरील खोलीच्या खिडकीच्या स्लायडींग मधुन बाहेर येवुन पहिल्या माळयावरुन खाली उडी मारुन अंधाराचा फायदा मांडवी पोलीस ठाण्याच्या पाठीमागील जंगलामध्ये पसार झालेला होता.

मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या
हददीमधील, घरफोडी आणि मोबाईल चोरी तसेच मंदिरामध्ये चोरी केल्याची कबुली या आरोपीने दिलेली आहे. या उच्छाद मांडलेल्या आरोपीला पकडण्यासाठी परिमंडळ ०३ चे पोलीस उप आयुक्त, सुहास बावचे, विरार विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त, रामचंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. मांडवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ, पोलीस उप निरीक्षक संदिप सावंत,सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत टेलर, पोलीस उप निरीक्षक राजशेखर सलगरे यांच्यासह इतर कर्मचारी यांच्या पथकाने कोपर गावाच्या जंगलामधुन आरोपीला अटक केली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

300 मेळाव्यांमधून 5 लाख रोजगार उपलब्ध करून देणार – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

 

सामाजिक न्याय भवन येथे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तृतीयपंथी यासाठी कार्यशाळा

 

 

Comments are closed.