Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थविरोधी जनजागृती; 34 पान टप-यांवर करण्यात आली कारवाई

चंद्रपूरातील आरोग्य विभाग-अन्न  व औषध प्रशासन- पोलीस विभाग यांच्या संयुक्त पथकांनी केली कारवाई. तंबाखू च्या दुष्परिणामाची जाणीव व नवीन पिढी तंबाखूच्या आहारी जाऊ नये यासाठीचा उपक्रम.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

चंद्रपूर, दि. १६ जानेवारी :  राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर अंतर्गत तंबाखू नियंत्रण भरारी पथक मार्फत कोटपा कायदा २००३ ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी चंद्रपुरात जनजागृती अभियान राबविण्यात आले. शहरातील जटपुरा गेट- रामनगर -वरोरा नाका- जनता महाविद्यालय परिसर येथील ३४ पान ठेल्यावर कारवाई करण्यात आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ही कारवाई आरोग्य विभाग, अन्न  व औषध प्रशासन, पोलीस विभाग यांच्या मार्फत करण्यात आली. मुख्यत्वे सार्वजनिक ठिकाणी, महाविद्यालय, हॉस्पिटल, शाळा या परिसरातील पानठेल्यावर करण्यात आली. जास्तीत जास्त लोकांना तंबाखू च्या दुष्परिणामाची जाणीव होईल व नवीन पिढी तंबाखूच्या आहारी जाणार नाही, हा कारवाईमागील मुख्य उद्देश होता.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पोलीसांची अब्रू चव्हाट्यावर! रिक्षा, जीप चालकाकडून अव्वाच्या सव्वा रुपये हप्ता घेणाऱ्या पोलीसचा व्हीडिओ झाला व्हायरल…

अल्पवयीन मुलीचं गर्भपात प्रकरण : आर्वीच्या डॉ. कदम हॉस्पीटलच्या झडतीत मिळाली काळविटाची कातडी

 

Comments are closed.