Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बिबट्याच्या हल्ल्यात गुराखी ठार

पेंटीपाका जंगल परिसरातील घटना.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २८ ऑक्टोंबर : बिबट्याच्या हल्ल्यात गुराखी ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने सिरोंचा तालुक्यातील पेंटीपाका गावात एकच खळबळ उडाली आहे.

रोजच्या प्रमाणे गुराखी जंगलामध्ये बकऱ्या चारवण्यासाठी नेले असता आज दि. २८ ऑक्टोंबर रोजी दुपारच्या सुमारास बकऱ्या चारत असतांना जंगलात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक बैलावर हल्ला केला. त्यावेळी गुराखी मलय्या दुर्गम यांच्या लक्षात घटना येताच बिबट्याला पळवून लावण्यासाठी प्रतिकार केला. मात्र त्यात चक्क बिबट्याने बैलाला सोडून गुराखी मलय्या दुर्गम (५०) यांच्यावर प्राणघात हल्ला करून शंभर मीटर फरफटत नेल्याने गुराख्या चा जागीच मृत्यू झाला.तर दुसरा सहकारी आरडाओरडा करीत बालबाल बचावला आणि झालेला प्रसंग गांवातील नागरिकांना सांगितले

त्यावेळी नागरिकांनी पोलीस ठाणे तसेच वनविभागाला माहिती देत जंगलाकडे धाव घेत घटनास्थळ गाठले. मात्र त्या ठिकाणी गुराखी यांचा मृतदेहच आढळून आल्याने पेंटीपाका गावात एकच खळबळ उडाली असून गावात शोक व्यक्त केल्या जात आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या घटनेची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी असरअल्ली यांना मिळताच घटनेस्थळी पोहचून मोका पंचनामा करण्यात आला आहे. मृतक मलय्या दुर्गम यांची परिस्थिती हलाकीची असल्याने वनविभागाकडून मृत परिवारास योग्य मोबदला देण्यात यावा. अशी मागणी स्थानिक पेंटीपाका गावातील नागरिकांनी केली आहे. तर दुसरीकडे बिबट्याच्या हल्ल्यामुळे नागरिकांत दहशत निर्माण झाली असल्याने वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी उचलून धरली आहे.

मृतक गुराखी मलय्या दुर्गम हे आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी गुराखीचे तसेच मोलमजुरीचे काम करून उदरनिर्वाह करीत होते. मात्र अचानक बिबट्याच्या हल्ल्यात गतप्राण झाल्याने घरातील कर्ता माणूस गमावल्याने त्यांच्या परिवारावर मोठे संकट ओढवले आहे. मृतकाच्या परिवारात दोन मुली, दोन मुले, पत्नी व आई असा मोठा परिवार आहे.
हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

ट्रॅक्टर उलटल्याने दोघांचा जागीच मृत्यू!

धक्कादायक ! ४५ वर्षीय महिलेवर सामुहिक अत्याचार

नवाब मलिक यांच्याविरोधात समीर वानखेडे यांच्या बहिणीची राष्ट्रीय महिला आयोगात तक्रार दाखल

Comments are closed.