Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वाळू मफियांचा नायब तहसीलदारावर प्राणघातक हल्ला..!

वाळू माफीयांनी पोटात चाकू खुपसल्याने नायब तहसीलदार गंभीर जखमी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

यवतमाळ, दि. २४ जानेवारी: महाराष्ट्रात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात वाळू माफीयांनी थैमान घातल्याचे चित्र दिसून येत आहे. याला नेमके जबाबदार कोण आहे? हे जनता ओळखून आहे. महसुल यंत्रणेचा वचक कमी झाला असल्याचे या निमित्ताने दिसुन येत असल्याचे खुलेआम बोलले जात आहे.  

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे रविवार दिनांक 23 जानेवारी रोजी रात्री 11.00 वाजताच्या दरम्यान उमरखेड-ढाणकी रोडवर गो. सी. गावंडे कॉलेज जवळ रेती तस्करी वाहनाची तपासणी सुरु असतांना अचानक एकाने उमरखेड तहसिलचे नायब तहसिलदार वैभव विठ्ठल पवार यांच्या पोटात चाकू खुपसला. काही कळायच्या आत आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. त्यामुळे अद्यापही आरोपी पोलिसांना सापडलेला नाही.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पोलिसांनी आरोपीच्या काही नातेवाईकांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली असून रात्रीच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. वैभव पवार यांना पोटात चाकूचे वार केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले असुन त्यांना तात्काळ शासकीय रुग्णालय उमरखेड येथे नेले असता डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले आहे. पवार यांच्यावर भगवती रुग्णालय नांदेड येथे सध्या उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान नायब तहसीलदार यांच्यावर चाकूहल्ला झाल्या प्रकरणी पोलीस प्रशासनाने उमरखेड शहरात अधिकची पोलीस कुमुक दाखल करून आरोपीचा शोध कसून घेत आहेत.

Comments are closed.