Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

चंद्रपूर, दि. ३ डिसेंबर  : राजुरा तालुक्यातील आनंदगुडा (लक्कडकोट) येथे आज सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास  बिबट्याने शेतकऱ्यास  ठार केल्याची घटना घडली आहे. हि राजुरा तालुक्यातील बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाल्याची महिनाभरातील दुसरी घटना आहे. ६ नोव्हेंबर तुम्मागुडा (सुब्बई) येथील शेतकऱ्यास बिबट्याने ठार केले होते.

सदर शेतकऱ्याचे नाव जंगु मारु कुरसंगे (५८) असे असून त्याच्या पश्चात पत्नी व २ मुले असा आप्त परिवार आहे. घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली असून वनविभागाविरोधात नागरिकांत प्रचंड रोष दिसून येत आहे. घटनास्थळी वनविभागाची चमू दाखल झाली असून पुढील कार्यवाही सुरु आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

३,५०० रुपयाची लाच स्वीकारतांना पोलीस हवालदारास रंगेहाथ अटक

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना पद्मभूषण प्रदान

लग्न स्वागत सोहळ्यात अन्नातून २०० जणांना विषबाधा

 

Comments are closed.