Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

घरफोडी – चोरी करणारे पाच गुन्हेगारांना अटक : आठ गुन्ह्यांची उकल

वालीव गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वसई, 23 नोव्हेंबर :- वालीव गुन्हे प्रकटीकरण पथकाने सराईत घरफोडी आणि चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करून तब्बल ८ गुन्हे उघडकीस आणले आहेत. घटनास्थळावरून तसेच गुप्त बातम्यादारामार्फत मिळवलेल्या माहितीच्या आधारे वसई पूर्वेला वालीव पोलीस ठाणे हद्दीत घोरपडी व चोरी करणाऱ्या आरोपींचा तपास करून वालीव पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने त्यांना ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे. गुन्ह्यात रेकॉर्डवरील तसेच इतर आरोपी सौरभ अनिल तिवारी (वय २२), रा. आप्पा पाडा, मालाड, मुंबई, हार्दिक विनोद कावा (वय २६) रा. वाकी वाडा, नायगाव, ता. वसई, राजू उर्फ सलमान शानमोहम्मद सिद्दिकी (वय २१) रा.वाकीपाडा नायगाव, ता. वसई, युवराजनाथ अमृत पटेल (वय ३१) रा. वसई(प), रिचर्ड रॉबर्ट डिसोजा (वय ३६) रा. गास कोपरी, विरार (पूर्व) अशा पाच आरोपींना अटक केली आहे.

आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी वालीव पोलीस ठाणे हद्दीत आणखी आठ गुन्हे केल्याची कबुली दिली. गुन्ह्यातील चोरीस गेलेले सोन्याचे दागिने, लोखंडी साहित्य, कॅमेरे, मॉनिटर, गॅस बाटले असा एकूण एक लाख ९६ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. परिमंडळ-२ चे पोलीस उपआयुक्त सुहास गावचे, नालासोपारा विभागाचे सहा. पोलीस आयुक्त तथा अतिरिक्त कार्यभार तुळींज विभागाचे सहा. पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मिलिंद साबळे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि. ज्ञानेश फड़करे, पोहवा. मनोज मोरे, पोहवा. मुकेश पवार, पोहवा. किरण म्हात्रे, पोहवा. सचिन बोरकर, पोहवा. राजेंद्र फड, पोहवा. सतीश गांगुर्डे, पोना. बाळू कुटे, पोअंम. गजानन गरीब, सचिन मोहिते, सचिन खताळ, जयवंत खांडवी यांनी वरील कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

आदिवासी विद्यार्थिनीची आत्महत्या संशयास्पद : खरे गुन्हेगार शोधण्यासाठी SIT नेमण्याची संघर्ष समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

जय सेवा क्लब गोलाकर्जी यांच्या वतीने भव्य व्हलिबॅल स्पर्धेचे आयोजन..!!

Comments are closed.