Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दिवसाढवळ्या भररस्त्यात तरुणाची केली निर्घुण हत्या! 

बीड शहरातील बसस्थानकालगतची घटना.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

बीड, दि. १४ डिसेंबर : बीड शहरातील बस स्थानकालगत मुख्य महामार्गावर भरदिवसा तरुणाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. शेख शाहिद शेख सत्तार (२४) रा. खासबाग बीड असे मृत युवकाचे नाव आहे.

शेख शाहिद हा बसस्टँड परिसरात असतांना अचानक आलेल्या ३ ते ४ जणांनी तीक्ष्ण हत्याराने त्याच्या पोटावर आणि छातीवर सपासप वार केले. या हल्ल्यात शाहिद गंभीररित्या जखमी झाल्याने त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हल्लेखोरांपैकी एकाला ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहितीअसून खून का केला ? हे अद्याप अस्पष्ट आहे.दरम्यान बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस गुंडा राजाच्या घटना घडत असल्याने जिल्ह्यात खाकीचा धाक संपलाय का ? असाच प्रश्न समोर येत आहे.या घटनेचा अधिक तपास पोलीस विभाग करीत आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

महाराष्ट्र विधान परिषद नागपूर प्राधिकारी मतदारसंघातून भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे विजयी घोषित

बिबट्याच्या चामड्याची तस्करी करताना चौघांना अटक; एक फरार

 

 

Comments are closed.