Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

3 तरुणींना सेक्स रॅकेटच्या जाळ्यात ढकलणाऱ्या टोळीचा नागपूर गुन्हे शाखेनं केला पर्दाफाश ,दोन आरोपींना घेतले ताब्यात

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर:९फ़ेब्रुवारी, नोकरी उपलब्ध असल्याची जाहिरात देऊन 3 तरुणींना  सेक्स रँकेट च्या जाळ्यात ढकलणाऱ्या टोळीचा नागपूर गुन्हे शाखेनं पर्दाफाश केलाय. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकातील पोलिसांनी हरियाणा आणि हैदराबाद इथल्या दोन दलालांना या प्रकरणात अटक केली आहे आणि त्यांच्या ताब्यातून 3 तरुणींची मुक्तता केली आहे. या प्रकरणात अजून कुणी गुंतलं आहे का? याचा शोधही पोलिस घेत आहेत.

अटक करण्यात आलेले आरोपी बऱ्याच काळापासून देह व्यापारात गुंतलेले होते. ते नागपुरात सक्रिय असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकानं त्यांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली होती. या दरम्यान आरोपींनी काही दिवसांपूर्वी नागपूर-अमरावती मार्गावरील भरतनगर परिसरातील स्वामी संकेत अपार्टमेंटमध्ये एक फ्लॅट भाड्याने घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी एक डमी ग्राहक पाठवून माहितीची सत्यता पडताळली. त्यानंतर पोलिसांनी या प्लॅटवर छापा टाळून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी कृष्णकुणार वर्मा आणि मोहम्मद मोबिन मोहम्मद ख्वाजा नावाच्या दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातील 3 तरुणींची मुक्तता केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

काही दिवसांपूर्वी आरोपींनी इंटरनेटवरील एका प्रचलित साईटवर नोकरी उपलब्ध असल्याची जाहीरात दिली होती. ती जाहीरात पाहून फरिदाबादमधील 3 तरुणींनी आरोपींना संपर्क केला. दर महिण्याला 1 लाख रुपये पगार मिळेल, असं आश्वासन मिळाल्यानंतर तिनही तरुणी नागपुरात आल्या. त्यानंतर आरोपींनी नागपूरअमरावती रोडवरील भरतनगर परिसरातील स्वामी संकेत अपार्टमेंटमधील एका फ्लॅटवर त्यांची राहण्याची व्यवस्था केली. आरोपींनी गेल्या काही दिवसांत या तरुणींकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला. ऑनलाईन बुकिंगच्या माध्यमातून हा सगळा व्यवसाय सुरु होता.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.