Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

२४ लाखाचा अवैध मद्य साठा जप्त, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
नाशिक : नाशिकच्या उत्पादन शुल्क विभागाने गोवा निर्मित तब्बल १४ लाख रुपये किमतीचा मद्यसाठा तसेच १० लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण २४ लाख रुपये किमतीचा माल जप्त केला आहे. कुरीयरच्या सिल बंद ट्रकमध्ये विदेशी दारू आणि बियरचा लाखो रुपये किंमतीचा साठा छुप्या मार्गाने महाराष्ट्रात आणि गोव्यात विक्रीसाठी नेत असताना नाशिकच्या उत्पादन शुल्क विभागाने हा माल नाशिक हद्दीत पकडून जप्त केला आहे. 

या कारवाईत वाहन चालकाला अटक करण्यात आली आहे. तर हा माल कुणाच्या माध्यमातून विक्रीसाठी आणला जात होता, याचा शोध पोलीस घेत आहेत, कर चुकवत आणला जाणारा हा माल गोव्याच्या तुलनेत इतर राज्यात दुप्पट किमतीने विकला जात असल्याने गोवा निर्मित मद्याची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते.

नाशिक उत्पादन शुक्ल विभागाच्या या कारवाईने मद्य तस्करांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी कर्मचारी अरुण चव्हाण, व्ही एम पाटील, ए. एस. सराफ, विठ्ठल हाके यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Comments are closed.